पुण्यात खळबळजनक प्रकार गुन्हे शाखेतील पोलिस उपनिरीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल,

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudyGOLDEN NIGHT
Advertisement

(Police sub inspector) तरुणीच्या तक्रारी नंतर तडकाफडकी निलंबित.

(Police sub inspector) पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे :

creat a new website 9999 ₹Digital visiting cardcreat a new website 4999 ₹

एका तरुणीच्या गुप्त अंगाला हात लावून त्याचे विनयभंग केल्याप्रकरणी पुणे शहरातील गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.

पोलीसच असे प्रकार करत असेल तर दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

तर उपनिरीक्षकावर विनयभंग आणि पॉस्कोचा गुन्हा दाखल झाला आहे.

Advertisement

पोलिस उपनिरीक्षकाने मद्यपान केल्यानंतर गोंधळ घालत २१ वर्षीय मुलीच्या गुप्त अंगाला हात लावून विनयभंग केला होता.

बेकायदेशीर रेमडेसिवीर विक्री प्रकरणात कारवाई केल्यानंतर आरोपींच्या नातेवाईकांबरोबर ओली पार्टीला गेल्यानंतर हा प्रकार घडला होता.

दिपक माने असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.उपनिरीक्षक दिपक माने हे युनिट ४ येथे कार्यरत आहेत.

गेल्या आठवड्यात १७ एप्रिल रोजी चतुःश्रृंगी परिसरात युनिट ४ ने रेमडेसिवीर इंजेक्शन विक्री करण्यास आलेल्या दोन सख्या भावाना अटक केली होती.

Advertisement

वाचा : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल .

तर त्यांच्याकडून दोन इंजेक्शन जप्त केले होते. याप्रकरणी चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यानंतर उपनिरीक्षक माने यांची यातील आरोपींच्या नातेवाईक असलेल्या व्यक्तीशी ओळख झाली.

त्यानंतर माने हे त्यांच्यासोबत पार्टीसाठी गेले होते. मद्यपान केल्यानंतर माने यांनी तक्रारदार तरूणीच्या १६ वर्षीय बहिणीस बोलावले.

Advertisement

तक्रारदार तरूणीशी अश्लील वर्तन केले तसेच उपनिरीक्षक माने यांनी तक्रारदार तरूणीच्या प्रायव्हेट पार्टला हात लावून त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न केली.

तसेच माने यांनी तक्रारदारच्या बहिणीचा हात धरून तिला जवळ ओढून तिच्या छातीस दाबले.

दरम्यान, ही तक्रार आल्यानंतर तडकाफडकी दिपक माने यांना निलंबित करण्यात आले होते.

तर, मुलींनी तक्रार देताच चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास चतुःश्रृंगी पोलीस करत आहेत.

Advertisement

वाचा : कोरोना नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे हुक्का विक्री करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल,

Advertisement

2 thoughts on “पुण्यात खळबळजनक प्रकार गुन्हे शाखेतील पोलिस उपनिरीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल,

Comments are closed.

%d bloggers like this: