न्यु इंडीया इन्सुरंन्स कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल,

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement
संग्रहित फोटो

(New India Insurance Company) १० लाख रूपये भरण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते आदेश.

(New India Insurance Company) पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी :

न्यु इंडीया इन्सुरंन्स कंपनीच्या कागदपत्रात फेरफार करून कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टेम्पो ट्रॅव्हलर वाहन क्र एम. एच.१२ एच. बी. ०३४३ हिचेवरील चालक हा यापुर्वी वानवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हयातील आरोपी असुन,

सदर टेम्पो ट्रॅव्हलरचे मालकाने न्यु इंडीया इन्सुरंन्स कंपनीची पॉलिसी नंबरची वैधता दि. १६ जानेवारी २०१६ ते १५ जानेवारी २०१७ असे पॉलिसीचे पेपर सादर केले होते.

त्यावरुन न्यायालयाने न्यु इंडीया इन्सुरंन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना १० लाख रुपये नुकसान भरपाई देणेबाबत समन्स दिले होते.

वाचा : कोंढव्यात हजरत टिपू सुलतान यांची जयंती साजरी

परंतु यातील वाहन मालक आरोपी याने वाहन त्याचे टेम्पो ट्रॅव्हलर वाहनाची पॉलीसी न्यु इंडीया इन्शुरन्स कंपनी लिमी या कंपनी मधुन काढली असुन,

त्याची वैधता दि. १६ जानेवारी२०१५ ते १५ जानेवारी२०१६ अशी होती.

परंतु त्यानंतर सदर वाहन आरोपी मालकाने सदर कंपनीकडुन पॉलीसीचे नुतणीकरण केले नाही.

तरी त्याने त्याचे मालकीचा टेम्पो टॅव्हलर क्र.एम.एच.१२एच. बी.0३४३ या गाडीचा न्यु इंडीया इन्शुरन्स कंपनीचा इन्शुरन्स कालावधी मध्ये बदल करुन,

बनावट पॉलिसी तयार करुन ती वैध असल्याचे भासवुन न्यु इंडीया इन्शुरन्स कंपनीची फसवणुक केल्याप्रकरणी कंपनीचे प्रशासकीय,

अधिकारी यांनी फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक वाडकर करित आहे.

वाचा : सराईत तडीपार गुन्हेगाराकडून रिव्हॉल्व्हर व काडतुसे जप्त,

Advertisement
Share Now