बैलांची शर्यतीवर बंदी असताना शर्यत लावल्या प्रकरणी १२ जणांवर गुन्हे दाखल,

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला गुन्हा.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्रात बैलांच्या शर्यतीवर बंदी असताना कात्रज घाट येथे बैलांची शर्यत लावल्या प्रकरणी १२ जणांवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील पोलिस हवालदार रविंद चिप्पा यांनी फिर्याद दिली आहे.‌ १७ जुलै रोजी गुजरवाडी बाबर मळा येथील डोंगराचे बाजुला असलेल्या सपाट मोकळया जागेवर कात्रज,पुणे येथे बैलांची शर्यत आयोजीत करण्यात आली होती.

बंदी आदेश जारी केला असताना देखील बैलांची शर्यत ठेवण्यात आली. बैलांना गाड्यांना जोडुन त्यांना निर्दयतेपणे मारहाण करुन‌ त्यांच्या शेपटया पिरगाळुन त्यांना जबरदस्तीने आरडा-ओरडा करत पळवुन निर्दयतेने वागवले.

फिर्यादी हे सदर शर्यतीचे आयोजक व सहभागी होणारे इतरांना बैलांची शर्यत करणे बेकायदेशीर असलेबाबत समजावत असताना त्यांनी फिर्यादी यांचेशी वाद-विवाद करुन,त्यांना धक्का-बुक्की करुन फिर्यादी यांचे सरकारी कामात अडथळा आणला आहे.

त्यानुसार संतोष अशोक ननवरे वय-४४वर्षे ,रा.गोकुळनगर,कोंढवा, योगेश बाळासाहेब रेणुसे, वय-२९वर्षे,रा. नेरावणे, ता.वेल्हा, जि.पुणे,मयुर दिलीप शेवाळे,वय-२६ वर्षे, रा.देवाची ऊरळी, शेवाळवाडी,पंढरीनाथ जगन फडके,वय-५५ वर्षे रा. विहीगर, पो.नेरे,ता.पनवेल,जि.रायगड,एक पुरूष वय ६५,रा.

हरिश्चंद्र भागा फडके,वय-५२.पदमाकर रामदास फडके,वय-३८ वर्षे.ऋषीकेश सुर्यकात कांचन,वय-२३ वर्षे,रा.ऊरुळी कांचन, संकेत शशिकांत चोरगे, वय-२१ वर्षे ,रा.भेलकेवाडी,ता.भोर,जि,

यश राजु भिंगारे,वय-१९ वर्षे,संतोष शिवराम कुडले,वय-४१ वर्षे,राहुल प्रकाश चौधरी, वय-३४,रा.वारजे यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस ठाणे करीत आहे.

Advertisement
Share Now