टपरी चालकाला दररोज ५०० रुपयांचा हप्ता मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल.

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement

कोंढवा पोलीसांनी केली कारवाई.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : कोंढव्यातील एका पानटपरी चालकाकडे रोजचे ५०० रूपये हप्ता मागितल्या प्रकरणी एका,

विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून इम्तियाज दाऊद मेमन वय ४५, रा. मिठानगर, कोंढवा खुर्द पुणे याला अटक करण्यात आली आहे.

गेल्या वर्षभरापासून तो हा हप्ता वसुल करीत‌ होता. याप्रकरणी रमजान रज्जाक खान वय २३, रा. बाबाजान मस्जिद जवळ शिवनेरीनगर, कोंढवा यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

रमजान खान यांची सत्यानंतद हॉस्पिटलसमोर पान टपरी असून ते गेल्या दोन वर्षांपासून पान टपरी चालवितात.

मागील २ महिन्यांपासून मेमन याने फिर्यादी खान यांना धमकावून पान टपरी चालवायची असेल तर मला दररोज ५०० रुपये हप्ता,

द्यावा लागेल,पैसे दिले नाही तर तुझी टपरी बंद करेन अशी धमकी दिली या धमकीला घाबरून फिर्यादी हे गेले २ महिने त्याला हप्ता देत होते. आतापर्यंत त्याने २५ हजार रुपये मेमन याला दिले.

आता मात्र त्याला पैसे देणे शक्य नसल्याचे त्याने सांगितल्यावर मेमनने त्यांना धमकाविण्यास सुरुवात केली.

शेवटी वैतागून खान यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर करीत आहे.

Advertisement
Share Now