वडापाव चोरल्याचा गजानन मारणे विरोधात गुन्हा दाखल,

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement

(Gajanan marne)तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

(Gajanan marne) पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे :

कुख्यात गुंड गजानन मारणेची तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर रॅली काढण्यात आली होती.

टोलनाक्यावर दहशत माजवली म्हणून गजा मारणे आणि त्याच्या साथिदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

गजा मारणे कारागृहातून बाहेर आल्या पासून विविध प्रकारचे गुन्हे त्याच्यावर आणि त्याच्या सहकाऱ्यांवर दाखल होत असल्याने गुंडावर पोलिसांनी कारवाई कसली आहे.

तर आणखीन एक गुहा उर्से टोल नाक्यावरील फुड मॉलमधील पाण्याच्या बाटल्या

आणि वडापाव पैसे न देता जबरदस्तीने घेतल्याप्रकरणी गजा मारणे आणि त्याच्या साथिदारांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार २५ फेब्रुवारी रोजी तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर गुंड गजानन मारणेच्या सहकाऱ्यांनी मिरवणुक काढली. त्यात वाहनांचा मोठा ताफा होता.

हा ताफा उर्से टोलनाक्यावर आला त्यावेळी मारणे याच्या समर्थकांनी आरडाओरडा करुन फटाके वाजवले.

त्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजची पाहणी केली.

त्यावेळी इतर वाहनांना बाजूला करुन टोल न देता गजानन मारणे आणि त्याचे साथिदार वाहने घेऊन गेले.

टोलनाक्यावर असलेल्या फुड मॉलमधील पाण्याच्या बाटल्या आणि वडापावचे पैसे न देता जबरदस्तीने घेतल्याचे समोर आले.

प्रकार समोर आल्यानंतर गजानन मारणेसह त्याच्या साथिदारांवर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement
Share Now