सहा वर्षांपासून जन्मदाता बापच पोटच्या मुलीवर करत होता बलात्कार

Father Rapes Daughter : आरोपी बापाला विश्रांतवाडी पोलिसांनी केली अटक,

Father Rapes Daughter : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे :

विश्रांतवाडी : सहा वर्षांपासून जन्मदाता बापच पोटच्या मुलीवर राहत्या घरात बलात्कार करत असल्याचा धक्कादायक प्रकार धानोरीत घडला आहे.

creat a new website 4999 ₹creat a new website 9999 ₹Digital visiting card

सोळा वर्षीय पीडित मुलीला वेदना होऊ लागल्याने तिने धाडस करून शेजारील महिलांना हा प्रकार सांगितला.

हे ऐकताच त्यांना धक्का बसला व त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली . आरोपी बापाला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपीवर (पोक्सो) बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत,तसेच बलात्काराचा गुन्हा हि दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

वाचा : बहिणीच्या मुलीलाच मावशी दाखवत होते पॉर्न व्हिडिओ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘४५ वर्षीय आरोपी हा बिगारी काम करतो. पत्नी आणि दोन मुलींसोबत तो धानोरीतील मुंजाबा वस्तीमध्ये राहतो.

आरोपी त्याची मोठी मुलगी दहा वर्षांची असल्यापासून म्हणजे २०१३ पासून तिच्यावर बलात्कार करत होता.

हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देत होता. आरोपीने एक सप्टेंबरला रात्री पुन्हा मुलीवर बलात्कार केला.

Advertisement

वारंवार अत्याचार होत असल्याने दोन दिवसांपूर्वी मुलीच्या पोटात वेदना होऊ लागल्या. त्यामुळे मुलीने धाडस करून घडलेला प्रकार शेजारील महिलांच्या कानावर घातला.

महिलांनी क्षणाचाही विलंब न करता मुलीला विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात नेले. (गुन्हे) पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांनी मुलीला धीर दिला.

वडील सहा वर्षांपासून अत्याचार करत असल्याचे तिने पोलिसांना सांगितले.

एक महिन्यापूर्वी या आरोपीने त्याच्या चौदा वर्षांच्या लहान मुलीशीही अश्लील वर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे .

Advertisement

पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे.

Birthday party Ko Lee gai Talwar padi bhari

%d bloggers like this: