माजी पोलीस निरीक्षकाच्या मुलावर करणी केल्याचा खळबळजनक प्रकार,

(Son of a former police inspector) कोर्टाच्या आदेशाने सून आणि तिच्या कुटुंबावर गुन्हा दाखल.

(Son of a former police inspector) पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे :

creat a new website 9999 ₹creat a new website 4999 ₹Digital visiting card

माजी पोलीस निरीक्षकाच्या मुलावर करणी केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

तर या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने सून आणि तिच्या कुटुंबावर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी निवृत्त पोलीस निरीक्षक मसाजी काळे यांनी चतुशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Advertisement

वाचा: वडापाव चोरल्याचा गजानन मारणे विरोधात गुन्हा दाखल,

त्यानुसार सून अपर्णा नितीन काळे,अशोक बापूराव डुकरे, चंद्राक्षी अशोक डुकरे,

कविता मोहन धोत्रे, तनुजा शिंदे, समीर अशोक डुकरे, मोहन नामदेव धोत्रे, यांच्यासह इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंध अन्वये गुन्हे दाखल केले आहे.

Advertisement

मसाजी काळे यांनी पोलीस निरीक्षक म्हणून २ वर्षांपूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे.

मसाजी पिंपरी चिंचवड आयुक्तालयात नेमणुकीस होते. दरम्यान त्यांच्या मुलाचा २०१७ मध्ये अपर्णाशी विवाह झाला होता.

यानंतर मात्र सून आणि तिच्या कुटुंबाने त्यांच्या वागण्यानुसार मसाजी यांच्या मुलावर एका मांत्रिक बाईचा सल्ला घेऊन करणी केली, असे फिर्यादीत म्हंटले आहे.

तसेच अघोरी कृत्ये केले आहेत. तर सूनाच्या कुटुंबाने समाजाच्या वधुवर केंद्रात खोटी माहिती देऊन फसवणूक केली.

Advertisement

वाचा : शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ व सी ए ए च्या विरोधात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर rpi(i)चा मोर्चा.

याबाबत त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. सदरील अर्जावर अर्जावर पोलिसांनी चौकशी पूर्ण करून गुन्हा दाखल केला नाही.

त्यात तथ्य नसल्याचे सांगत प्रकरण निकाली काढले होते. त्यानंतर मसाजी यांनी कोर्टात अर्ज केला होता.

त्यानुसार कोर्टाने पोलिसांना गुन्हा दाखल करून चौकशी करा आणि त्याचा अहवाल सादर करावा असे आदेश दिले आहेत.

Advertisement

2 thoughts on “माजी पोलीस निरीक्षकाच्या मुलावर करणी केल्याचा खळबळजनक प्रकार,

Comments are closed.

%d bloggers like this: