तहसिलदारांनी लाच मागितली नसताना देखील गुगल-पे द्वारे ५० हजार देणा-या विरोधात तक्रार दाखल,

ebook.trendingstudysajagnagrikktimes.sajag-advertisement-offer
Advertisement

तहसिलदार तृप्ती कोलते- पाटील यांनी दिली खडक पोलिस ठाण्यात तक्रार.( Trupti kolte Patil)

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : लाच मागितली नसताना देखील गुगल-पे द्वारे ५० हजारांची लाच बॅंक खात्यात जमा करणा-या विरोधात पुण्यातील मामलेदार कचेरीतील हवेली तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

चोरीची वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर हवेली तहसीलदार तृप्ती कोलते यांनी कारवाई केली. परंतु तहसीलदार कोलते यांच्या संमती शिवाय ट्रक मालकांनी ‘गुगल पे’ द्वारे ( Google pe) ५० हजार रुपयांची लाच परस्पर दिल्याचे समोर आले आहे. या ट्रक मालकाविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात ( Khadak police station) व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ( anti corruption bureau Pune) हवेली तहसीलदार कोलते यांनी बळजबरीने बेकायदा कामासाठी लाच देऊ केल्याची तक्रार दाखल केली आहे.

हकीकत अशी की पुणे-सोलापूर महामार्गावरील शेवाळवाडी बस डेपो जवळ एम एच १६ टी ४१०० हा ट्रक बेकायदा वाळू वाहतूक करीत होता. हा ट्रक बेकायदा वाळू वाहतूक करत असल्याचे हवेलीचे तहसीलदार कोलते-पाटील यांना आढळून आला.


त्यावेळी ट्रक चालकास ट्रक बाजूला घेण्यास सांगून ट्रक थांबविला.
यावेळी ट्रक मधून चालक चावी घेऊन उडी मारून पळून गेला. तहसीलदार कोलते यांनी हडपसरचे मंडलाधिकारी व्यंकटेश चिरमुल्लाा ( Venkatesh chirumamilla) यांना भ्रमणध्वनीवरून माहिती देऊन तलाठी किंवा कोतवाल यांना ट्रकच्या ठिकाणी पाठवावे असे सांगितले.

यावेळी ट्रक जवळ त्यांच्या गाडीत चालकासह तलाठ्याची वाट पाहत कोलते या बसल्या होत्या. यावेळी एक तरुण तेथे आला. मी गाडीचा मालक आहे असे सांगत, गाडी सोडण्यासाठी विनंती करू लागला.


यावेळी पैशाचे आमिष देऊ लागला.यावेळी कोलते यांनी त्याला स्पष्ट नकार देऊन कारवाई करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर कोतवाल तंगडे गाडीच्या ठिकाणी आला.त्यावेळी गाडीची तपासणी करून पंचनामा करण्याच्या सूचना देऊन गाडी त्यांच्या ताब्यात देऊन कोलते या तहसील ( tahsil office Pune) कार्यालयाकडे निघाल्या.सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास या भ्रमणध्वनीवरून कोलते यांना चार मिस कॉल आले.

त्या बैठकीत असल्याने त्यांनी ते कॉल स्वीकारले नाहीत. तथापी वारंवार फोन येत असल्याने त्यांनी त्याभ्रमणध्वनीवर बैठकीनंतर कॉल केला. त्यावेळी फोनवरून बोलणाऱ्या व्यक्तीने त्यांचा बँक खाते नंबर मागितला आणि त्या खात्यात पैसे जमा करायचे आहेत असे सांगितले.

पैसे कशाबद्दल जमा करायचे आहेत असे विचारल्यावर त्यांनी सांगितले,की तुम्ही जी वाळूची गाडी पकडली आहे. त्या गाडीच्या मालकाने तुमच्या अकाउंटवर पैसे जमा करण्यास सांगितले आहे म्हणून तुमचा बँक खाते नंबर द्या असे बोलू लागला.

यानंतर फोनवरून बोलणाऱ्या व्यक्तीस कोलते यांनी खडसावून तुमच्या
विरोधात मला लाच देत असल्याबाबतची तक्रार देणार असल्याचे सांगितले. काम उरकून कोलते- पाटील या घरी जाण्यास निघाल्या असता, त्यांच्या चालकाने सांगितले आज पकडलेल्या अनाधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या मालक व काही लोक गाडी जवळ आहेत आणि तुमच्या सेविंग अकाउंट वर पन्नास हजार रुपये जमा केले आहेे.


असे सांगत होते. कोलते- पाटील यांनी स्वताचे बॅंके खाते तपासले असता त्यात अनोळखी नंबर वरून ५० हजार रुपये गुगल पे केल्याचे दिसून आले आहे. यामुळे तृप्त कोलते-पाटील यांनी खडक पोलीस ठाण्यात व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे.

Advertisement
Share Now