पुणे महानगर पालिकेतील उप-अभियंता ४० हजाराची लाच घेताना अटक,

ebook.trendingstudysajagnagrikktimes.sajag-advertisement-offer
Advertisement

शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.( Deputy Engineer of Pune Municipal Corporation arrested while accepting bribe of Rs 40,000)

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : पुणे महानगर पालिकेतील (Pune PMC) उप अभियंताने कामाचे बिले काढण्यासाठी ४० हजाराची लाच स्वीकारताना

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले असल्याने पुणे महानगर पालिकेत खळबळ उडाली आहे. एका ३९ वर्षीय इसमाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

त्या तक्रारीची पडताळणी करून पुणे मनपाच्या पार्किंग मध्ये सापळा रचून सुधीर विठ्ठलराव सोनवणे उप अभियंता वर्ग -२, रस्ते विभाग पुणे महानगरपालिका यांना अटक करण्यात आली आहे.

तक्रारदार हे बांधकाम ठेकेदार असून त्यांनी सन २०१८ २०१९ मध्ये केलेल्या शाळेच्या दुरूस्तीचे कामांचे बील पास झाले नसल्यामुळे लोकसेवक सुधीर सोनवणेे ( Sudhir sonone) यांना ते भेटले असता बील मंजुर करणे व

यापुर्वी दुस-या कामाचे बील मंजूर केल्याचा मोबदला म्हणून तक्रारदार यांचेकडे ५० हजाराची लाचेची मागणी करून त्यापैकी ४० हजारांची लाच

स्वीकारल्यावर त्यास रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले असून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भारत साळुखे पोलीस निरीक्षक हे करत आहेत.

Advertisement
Share Now