दिपक मारटकर खुन प्रकरणातील मुख्य सुत्रधारास अटक

(Deepak Maratkar murder Case) युनिट – १ गुन्हे ची कामगिरी – मारटकर खुन प्रकरणातील मुख्य सुत्रधारास केले जेरबंद

Deepak Maratkar murder Case: पोलीस न्यूज 24 :

Digital visiting cardcreat a new website 4999 ₹creat a new website 9999 ₹

२ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री शिवसेनेचा कार्यकर्ता दिपक मारटकर याचा गवळी आळी बुधवार पेठ पुणे येथे खून करण्यात आला होता,

अश्विनी कांबळे , सनी कोलते व महेंन्द्र सराफ यांच्या मध्ये असलेल्या जुन्या राजकीय वादाच्या कारणावरुन त्याचा राग मनात धरुन महेन्द्र सराफ व अश्विनी कांबळे यांच्या सांगण्यावरुन

सनी कोलते, संदीप कोलते, रोहीत कांबळे, राहुल रागीर, अतुल भोसले, लखन ढावरे व इतर दोन इसम यांनी संगणमत करुन

Advertisement

दिपक मारटकर यांच्या डोक्यावर ,हातावर तोंडावर धारदार शस्त्राने वार करुन त्यांना जिवे ठार ठार मारले होते .

या खून प्रकरणी फरासखाना पो. स्टे. पुणे गुरनं १०९४/२०२० भादंवि कलम ३०२, १४३, १४४, १४७,

१४८, १४९, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

दाखल गुन्हयात स्वप्नील ऊर्फ चॉकलेट सतीश मोडवे याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. गुन्हा घडल्यापासून तो फरार झाला होता.

Advertisement

वाचा :> पुणे शहरात राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याचा खून,

तो कुख्यात बाप्पु नायर टोळीतील सक्रिय सदस्य असून सध्या तो सदर टोळीचा मुख्य सुत्रधार म्हणून कार्यरत आहे.

युनिट – १ गुन्हे पुणे कडील पोलीस अधिकारी व कर्मचारी सदर गुन्हयातील पाहीजे आरोपींचा शोध घेत असताना,

पाहीजे आरोपी स्वप्नील ऊर्फ चॉकलेट सतीश मोडवे फरार राहुन सतत आपले राहते ठिकाण बदलुन पोलीसांना गुंगारा देत होता.

तो सध्या इस्लापुर,सांगली, कराड या भागात असल्याची माहिती पोलिस हवालदार अजय थोरात व अमोल पवार यांना मिळाली होती.

Advertisement

त्यानुसार पोलीसांचे एक पथक तात्काळ त्याचा शोध घेण्यासाठी पाठविण्यात आले होते.

दिनांक – २०/१०/२०२० रोजी आरोपींचा शोध घेत असताना पोलीसांना सदर गुन्हयातील पाहीजे असलेला आरोपी हा स्वप्नील ऊर्फ चॉकलेट सतीश मोडवे हा पेठ नाका,

कराड जि सातारा येथे असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी

त्याबाबत सखोल माहिती काढून सापळा लावून आरोपी हा पांढ-या रंगाच्या क्रेटा गाडी नंबर एमएच-१२-आरटी-२२१७ हिचेसह पेठ नाका चौक येथे आला असता त्यास पकडले आहे.

Advertisement

त्यांच्या कडे प्राथमिक तपास केला असता प्रथम त्याने उडवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे दिली त्याला विश्वासात घेवुन सखोल तपास केला असता त्याने गुन्हयात सहभाग असल्याचे सांगीतले तशी त्याने कबुली दिली आहे.

त्यांचा सदर गुन्हयात सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे. पुढील कारवाईसाठी फरासखाना पोलीस स्टेशन पुणे यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे.

वाचा > चोराशी रोमॅन्टिक चॅटिंग करून प्रेमात पाडले ,व नंतर त्याला तुरुंगात पाठविले

सदर आरोपीच्या विरुध्द खुन, खुनाचा प्रयत्न दरोडा, गंभीर दुखापत असे एकुण सहा गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी गुन्हे शाखा पुणे शहर अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे. बच्चनसिंग,

Advertisement

सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्र देशमुख यांच्या मार्गदशनाखाली युनिट १ गुन्हे शाखा, पुणे शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल ताकवले, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत शिंदे,

पोलीस उपनिरीक्षक, संजय गायकवाड, युनिट-१ गुन्हे पथकातील पोलीस कर्मचारी अजय थोरात, अमोल पवार, इमरान शेख, योगेश जगताप,सुधीर माने,बाबा चव्हाण,

अशोक माने,अजय जाधव, महेश बामगुडे, विजयसिंह वसावे,गजानन सोनुने,शशिकांत दरेकर यांनी केली आहे,

Advertisement
%d bloggers like this: