भाजी मंडई मध्ये मोबाईल चोरणारे चोरट्यांना पोलीसांनी केली अटक,

ebook.trendingstudysajagnagrikktimes.sajag-advertisement-offer
Advertisement

कोथरूड-चतुर्शिंगी-हडपसर पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : भाजी मंडईत खरेदारीसाठी आलेल्या नागरिकांचे लक्ष विचलित करून मोबाईल चोरी करणाऱ्यांना दत्तावाडी पोलिसांनी जेरबंद केले आहे.

वरिष्ठांचे आदेशान्वये दत्तवाडी पोलीस ठाणे कडील तपास पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार आणि पोलीस स्टाफ दत्तवाडी हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना २७ एप्रिल रोजी

पोलीसांना माहिती मिळाली की भाजी मंडईत गर्दीचा फायदा घेवुन सर्वसामान्य नागरिकांचे मोबाईल जबरदस्तीने हिसकावुन नेणारे दोन चोरटे पाटे संस्कृती सहकारनगर पुणे येथील मोकळया मैदानातील विहीरीजवळ मोबाईल विक्रीचे प्रयत्नात थांबलेले आहेत.

अशी माहिती मिळताच मिळालेल्या माहितीनुसार दत्तवाडी तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सापळा लावुन अत्यंत शिताफीने सदर ठिकाणी दिनेश तिम्मा मकराळे वय- २७ वर्षे, रा. सर्व्हे नं.७९ विकास नगर दुर्गा मंदीरजवळ, घोरपडी, पुणे व धर्मा बसाप्पा गवंडी वय- २७ वर्षे, रा. सदर यांना पकडले.

त्यांच्याकडून दोन जबरी चोरीचे गुन्हे उघड झाले असुन गुन्हयांतील मोबाईल जप्त करण्यात आले आहेत भाजी मंडईत तसेच गर्दीच्या ठिकाणी पैसे खाली टाकुन नागरीकांचे लक्ष विचलीत करुन हात चालाखीने जबरदस्तीने मोबाईल हिसकावून नेले असल्याचे आतापर्यंत तपासात निष्पन्न झाले आहे.

दोन्ही आरोपी सराईत असुन त्यांचेवर पुणे शहरातील कोथरुड, चर्तु●गी, हडपसर या पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपींकडुन शहरातील इतर मोबाईल चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता असुन पुढील सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार दत्तवाडी पोलीस ठाणे हे करीत आहेत.

Advertisement
Share Now