हडपसर पोलीस स्टेशनला दबंग अधिकारी बाळकृष्ण कदम यांचे आगमन,

(Dabangg officer) तांबे-साठे यांच्याप्रमाणे गुंडांना जरब बसवण्याचे कदम यांच्यापुढे आव्हान

(Dabangg officer) : पोलिस न्यूज 24 :

creat a new website 9999 ₹creat a new website 4999 ₹Digital visiting card

पुणे : हडपसर उपनगरात वाढत्या लोकसंख्येबरोबरच गुन्हेगारीचे प्रमाणही प्रचंड वाढले आहे,

यावर अंकुश बसविण्याची जबाबदारी, नव्यांन रुजू झालेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम व त्यांच्या सहकारी पोलीस अधिकाऱ्यांची आहे,

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे यांची अल्पावधीत विशेष शाखेत बदली झाली आहे.

Advertisement
dabangg-officer-balkrishna-kadam-join-at-hadapsar-police-station
संग्रहित फोटो

येथील अवैध धंदे व वाढलेली गुन्हेगारी आटोक्यात आणण्याचे प्रयत्न रमेश साठे यांनी प्रामाणिकपणे केले.

हडपसर उपनगर झपाट्याने वाढत आहे, नागरिकीकरणाबरोबर दोन उच्चभ्रू टाऊनशीप असलेला हा परिसर

तर एका बाजूला उच्चभ्रू लोकवस्ती तर दुसरीकडे स्लम भाग त्यात पालिकेचे म्हाडा व एसआरए प्रकल्प यांच्यामध्ये खून,

गुंड,चोरटे,तडीपार यांचा वाढलेला वावर यामुळे बलात्कार, अपहरण, मोबाईल-चैन स्नाचिंगच्या घटना वाढल्याने गुन्हेगारी प्रचंड वाढलीआहे.

Advertisement

सुनील तांबे हडपसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असताना त्यांनी राजकीय दबाव झुगारून कारवाईचा धडाका लावला अन गुन्हेगारांवर चांगलीच जरब बसवली होती,

गुन्हेगार व सेटिंग पंटर,स्वयंघोषित नेते कार्यकर्ते हडपसर पोलीस स्टेशनकडे फिरकतही नव्हते एवढा त्यांचा धाक होता,

त्यांनी प्रमुख पक्षांच्या राजकीय मातब्बर कार्यकर्त्यांनाही दणका दिल्याने तत्कालीन भाजप सरकारच्या काळात त्यांची राजकीय दबावातून बदली झाली अन हडपसरकर एका “सिंघम” अधिकाऱ्यास मुकले .

त्यांनतर आलेले पोलीस अधिकारी रमेश साठे यांनी सुनील तांबे यांच्याप्रमाणे जरब बसवली,

पोलीस स्टेशनमध्ये सेटिंग पंटर म्हणून प्रस्थान बसवण्याचा प्रयत्न करणाऱ्या हडपसर व पुणे शहरातील पत्रकारांचा म्होरक्या म्हणून मिरवणाऱ्या वादग्रस्त तोतया पत्रकारावर रमेश साठे यांनी गुन्हे दाखल करून आपली कर्तव्य दक्षता दाखवून दिली,

Advertisement

लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील मोठा भाग काही महिन्यांपूर्वी हडपसर पोलीस ठाण्यात समाविष्ट करण्यात आला.

त्यामुळे येथील कामाचा लोड वाढला. वाढते नागरीकरण त्यात पोलिसांची मर्यादित संख्या लक्षात घेता हडपसर पोलिसांवर निश्चितच बंदोबस्ताचा ताण वाढला आहे.

सध्या गर्दीच्या ठिकाणी सोने, मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले आहे, लहान वयाच्या मुलांमध्ये वाढलेली गुन्हेगारी हा येथील गंभीर प्रश्न असून याकडे कानाडोळा करून चालणार नाही.

तीन पोलीस स्टेशनचा भार असलेले हडपसर पोलीस स्टेशन चालविणे हे एक मोठे दिव्यच आहे.

Advertisement

बाळकृष्ण कदम नव्याने हडपसर पोलीस स्टेशन मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झाले आहेत.

पुण्यातील समर्थ पोलीस स्टेशनमध्ये काम करताना गुन्हेगारांवर जरब बसवत विविध आव्हानात्मक गुन्हे उघडकीस आनले आहेत.

वाचा : सोमवारी पुण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या

हडपसर परिसर मोठा आहे ,पोलीस संख्याबळ कमी त्यामुळे अवैध धंदे आणि गुन्हेगारी संपविण्याचे मोठे आव्हान त्यांच्यापुढे आहे.

हडपसर परिसर सुरक्षित करण्यासाठी पोलीस स्टेशन परिसरात सेटलमेंट पंटर मंडळींचा वावर थांबविणे गरजेचे आहे,

Advertisement

अवैध धंद्यांना प्रोत्साहन देणाऱ्यांवर कडक कारवाई होऊन सामाजिक व राजकीय संघटनांचा बुरखा पांघरून दुकानदारी करणाऱ्यांवर आणि विविध गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारावर अंकुश असला पाहिजे अशी हडपसरवासीयांची भूमिका आहे.

स्लम परिसरातील अल्पवयीन मुलांचे प्रबोधन झाल्यास अल्पवयीन गुन्हेगार कमी होतील, समाजातील जागरूक नागरिकांची समिती करावी,

पेट्रोलिंगचे प्रमाण वाढवण्याबरोबर नोकरीच्या आमिषाने बेरोजगाराना लुबाडणारी दुकाने बंद झाली पाहिजेत.

लखोपती, करोडपती होण्याची स्वप्न दाखवून धार्मिक कंपनीच्या नावाखाली मल्टी चैन स्कीम राबवून

Advertisement

अडाणी,धार्मिक,गरीब लोकांना सभासद बनवून गंडा घालणाऱ्या मंडळींचाही पर्दाफाश होणे गरजेचे आहे.

वाचा : दीपक मारटकर खून प्रकरणात गुंड बापू नायरला अटक

सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी कडक उपाययोजना असायला हवी,मार्केट परिसरात खिसेकापू,

मोबाईलचोरांना आळा घालण्यासाठी धडक मोहीम राबविल्यास हडपसर परिसर शांत आनि सुरक्षित होण्यास खऱ्या अर्थाने मदत होणार आहे,

आणि बाळकृष्ण कदम यांच्यासारखा दबंग अधिकारी हडपसरला आल्याने तांबे-साठे यांची कर्तव्यदक्ष कारकीर्द त्यांनी पुढे सुरू ठेवल्यास हडपसर उपनगर सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे.

Advertisement

2 thoughts on “हडपसर पोलीस स्टेशनला दबंग अधिकारी बाळकृष्ण कदम यांचे आगमन,

Comments are closed.

%d bloggers like this: