ATM कार्ड क्लोनिंग करुन बनावट कार्डद्वारे पैसे काढणारी गुन्हेगारी टोळी अटक : पोलिसांची जबरदस्त कारवाई,

ebook.trendingstudysajagnagrikktimes.sajag-advertisement-offer
Advertisement

९१ बनावट ATM-डेबीट कार्ड व रोख रक्कम मिळाल्याने उडाली खळबळ.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : सायबर पोलीस ठाण्यात लोकांच्या बँकेतील पैसे त्यांचे ए.टी.एम./डेबीट कार्ड क्लोन करुन अन्य जिल्ह्यांच्या ए.टी.एम. सेंटर मधून काढले जात असले बाबत मोठया प्रमाणात तक्रार अर्ज प्राप्त होत होते.

तक्रारी अर्जाचे अनुषंगाने अर्जदार डेनिस सुसेराज मायकल, वय-३२ वर्षे, धंदा- नोकरी, रा. नमो विहार, १०३, सातव नगर,

हांडेवाडी रोड, हडपसर पुणे ,यांचे ए.टी.एम./डेबीट कार्डाचे क्लोनिंग होवून त्यांचे खात्यातून ३० नोव्हेंबर रोजी नाशिक येथील ए.टी.एम. सेंटर मधून ९ हजारचे प्रत्येकी ११ ट्रांन्झेक्शन,

व १ हजारचे एक ट्रान्झेक्शन करुन एकूण १ लाख रुपयांची फसवणुक करुन काढण्यात आले. त्या अनुषंगाने सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तसेच लष्कर पोलीस ठाणे येथे देखील याच अनुषंगाने तक्रारदार यांचे अर्जाचे अनुषंगाने विश्लेषण केले त्यानंतर पोलीस पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे नाशिक येथे जावुन स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन इसमांना ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या दोन आरोपींना सायबर पोलीस ठाणे कडील नमुद गुन्हयात अटक करण्यात आली.

मोहम्मद अकील आदील भोरानिया, वय ३७ वर्षे, रा. बनातवाला बिल्डींग, रूम नंबर ५ पहिला मजला, शायदा मार्ग, डोंगरी मुंबई,

व मोहम्मद फैजान फारुख छत्रीवाला, वय-३७ वर्षे, रा.सह्याद्री निवास, रुम नंबर ४२०, चौथा मजला, डॉ.महेश्वरी रोड, नुरबाग,

डोंगरी मुंबई, पहिल्या आरोपीकडे ३ मोबाईल फोन, युनियन बँक ऑफ इंडीया नावे बनावट बनवीलेली ३६ डेबीट कार्ड, ३० हजार ,

५०० रोख रक्कम, फेवीक्वीक च्या पांढ-या रंगाच्या प्लास्टीकच्या सहा लहान टयुब (सदरचे फेवीक्वीक आरोपी स्कीमर एटीएम सेंटरमध्ये चिटकवताना वापरतात) व इतर साहित्य हस्तगत केले आहे.

तर दुसऱ्या आरोपीकडून एक मोबाईल फोन,स्टेट बँक ऑफ इंडीया या बँकेची बनावट तयार केलेली ४६, आय .सी .आय .सी. आय.बँकेची २, आय.डी.बी.आय.बँकेचे १,पंजाब नॅशनल बँकेचे १,

तसेच कोणत्याही बँकेचे नांव नसलेले कोरे ५ असे एकूण ५५ डेबीट/ए.टी.एम कार्ड पीन नंबर लिहीलेले स्थितीतील मिळून आले,

व ७ हजार ४०० रोख रक्कम मिळून आली. दोन्ही आरोपींकडे मिळून एकूण ९१ बनावट ए .टी.एम./डेबीट कार्ड व रोख रक्कम रु ३७ हजार ९०० रुपये मिळून आले आहे.

यातील आरोपी मोहम्मद फैजान फारुख छत्रीवाला याने त्याचे इतर साथीदारांबरोबर मुंबई, उपनगर व ठाणे मध्ये तसेच हिमाचल प्रदेश, हैद्राबाद, गुजराथ याठिकाणी गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.

तसेच आरोपी हा गुन्हा केल्यानंतर नेपाळ मार्गे दुबई येथे पळुन गेला होता. तो डिसेंबर २०१९ मध्ये भारतात येवुन पुन्हा त्याचे साथीदारांसह कार्ड क्लोन करुन लोकांची फसवणुक करण्याचे गुन्हे करु लागला. दाखल गुन्हयाचे अनुषंगाने अधिक तपास सायबर पोलीस ठाणे करत आहे.

सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त भाग्यश्री नवटके, सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे,

अनिल डफळ,अमित गोरे तसेच अंमलदार संदेश कर्णे, अस्लम अत्तार शिरीष गावडे, अनिल पुंडलिक, नितीन चांदणे, यांचे पथकाने केली आहे.

Advertisement
Share Now