परदेशात नोकरी लावण्याच्या अमिषाने लोकांकडुन पैसे उकळणाऱ्या महिलेला गुन्हे शाखेने केली अटक,

ebook.trendingstudysajagnagrikktimes.sajag-advertisement-offer
Advertisement

(Crime Branch arrests woman) १६ वर्षापासुन आपले नाव बदलुन व अस्तित्व लपवुन पोलीसांना गुंगारा देत होती.

(Crime Branch arrests woman) पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे :

परदेशात नोकरी लावून देते म्हणतं लोकांना गंडा घालणाऱ्या व तब्बल १६ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणा-या महिलेला गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे.‌

ज्ञानेश्वर विश्वास जमदाडे वय ३२ रा – हिलटॉप सोनगिरी, धनकवडी पुणे यांनी सन २००५ साली खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे.

सदर गुन्ह्यातील आरोपी १) अबिदअली मसुदअली रा.१०७३ न्यु नाना पेठ , अजीज मंजील बिल्डिंग पुणे ,

२) अब्दुलवहाब महमंदहनीफ मुजावर रा – सैय्यदनगर , गंगा व्हिलेजसमोर हडपसर पुणे व

३) राहत सैय्यद मॅडम रा – नुराणी मजिदजवळ , जुना मोटार स्टँड भवानी पेठ पुणे

यांनी आपसात संगणमत करुन फिर्यादी व त्यांचे मित्र सुरेश रक्ती ,

प्रज्ञावंत करमरकर व इतरांना परदेशात नोकरी लावतो असे अमिष‌ दाखवले आणि त्यांचा विश्वास संपादन करुन,

त्यांचेकडुन‌ ४ लाख घेवुन त्यांना नोकरी न लावता व घेतलेले पैसे परत न देता त्यांचा विश्वास संपादन करुन फसवणुक केल्याबाबत त्यांचेविरुध्द तक्रार दिलेली होती.

त्यानुसार खडक पोलीस ठाण्यात ४२० चा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हे शाखा युनिट १ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार कार्यालयात हजर असताना पोलीस अंमलदार अमोल पवार यांना गुप्त बातमीदाराकडुन बातमी मिळाली की

परदेशामध्ये नोकरी लावण्याच्या बहाण्याने अनेक लोकांकडुन पैसे घेवुन त्यांची फसवणुकी करणारी

व १६ वर्षापासुन गुन्हयात फरार असलेली महिला राहत सैय्यद ही साकोरे नगर , विमाननगर पुणे या भागात आपले नाव बदलुन व अस्तित्व लपवुन राहत आहे.

साकोरे नगर विमाननगर पुणे या भागात पहाटेच्या वेळेस सापळा लावण्यात आला.

वाचा : Website हे प्रचंड लोकप्रियतेमुळे व्यवसाय वाढवण्यासाठी एक प्रभावी माध्यम होऊ शकते.

संशयीत महिला सकाळी मॉर्निग वॉकसाठी जात असताना दिसली तिस ताब्यात घेतले व तिस नाव पत्ता विचारता प्रथम तिने आपले नाव अलका शर्मा असे असल्याचे सांगीतले .

परंतु तिच्याकडे सखोल चौकशी केली असता तिने आपले खरे नाव राहत तालीबअली सैय्यद ऊर्फ अलका भगवानदास शर्मा

वय ५४ रा – ३०३ आनंदयोग सोसायटी , साकोरेनगर विमाननगर पुणे मुळ रा – बी/३१२ डीडीओ प्लॅट जागीरपुरी दिल्ली असे असल्याचे सांगीतले आहे.

सखोल तपास केला असता तिचा गुन्हयात सहभाग असल्याचे व सदर गुन्हयामध्ये ती सुमारे सोळा वर्षापासुन फरार निष्पन्न झाले आहे.

राहत हिला पुढील कारवाईसाठी खडक पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह-आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे,

अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे गुन्हे शाखा,पोलीस उप आयुक्त,श्रीनिवास घाडगे,गुन्हे शाखा,

सहा.पोलीस आयुक्त सुरेंद्रकुमार देशमुख, यांचे मार्गदशनाखाली युनिट-१ गुन्हे शाखा,

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनिल कुलकर्णी,

पोलीस अंमलदार अजय थोरात, अमोल पवार, इम्रान शेख, तुषार माळवदकर,

महिला पोलीस अंमलदार मिना पिंजण व रुखसाना नदाफ यांनी केली आहे.

वाचा : ४ लाख किंमतीचा २० ग्रॅम १६० मिलीग्रॅम कोकेन विक्री करणाऱ्या नायजेरियन तरुणाला

Advertisement
Share Now