घरफोडी करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास गुन्हे शाखेने केले जेरबंद,

ebook.trendingstudysajagnagrikktimes.sajag-advertisement-offer
Advertisement

१३ लाख ७ हजार ८२० रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : गुन्हे शाखेकडून समांतर तपास करत असताना पोलीस शिपाई गजानन सोनुने यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली,

पोलीस अभिलेखावरील घरफोडी चोरी करणारा इसम रफिक शेख रा. सय्यदनगर, हडपसर हा सर्प उदयान भारती विद्यापीठ पुणे. या ठिकाणी येणार‌ असुन त्याच्याकडे एक ॲक्टिवा गाडी आहे.

असे मिळालेल्या बातमीचे ठिकाणी जाऊन गुप्तपणे पहाणी करत असताना मिळालेल्या वर्णनाचा इसम सर्प उद्यान समोर ॲक्टिवा गाडीवर बसलेला दिसला.

त्यास ताब्यात घेऊन माहिती विचारता त्याने त्याचे नांव रफिक हुसेन शेख वय २७ वर्षे रा. गल्ली नं. ए- १८ सिल्वर हॉटेल जवळ सय्यदनगर, हडपसर पुणे. असे असल्याचे सांगीतले.

त्याचेकडे असलेल्या ॲक्टिवा बाबत विचारपुस करुन कागदपत्रे मागीतले असता त्याचकडे सदर गाडीचे कागदपत्र नव्हते.

त्याबाबत संशय आल्याने त्याकडे अधिक विचारपुस करता त्याने ती ॲक्टिवा चोरीची असल्याचे कबुल केले. युनिट कार्यालयात आणुन तपास केला असता त्याने घरफोडी चोरीचे गुन्हा केल्याचे कबुल केले.

त्याला न्यायालयातून पोलीस कस्टडीची रिमांड घेण्यात आली. पोलीस कस्टडीत असताना त्याच्याकडे अधिक विचारपुस करता त्याने पुणे शहर परीसरात घरफोडी चोरीचे अनेक गुन्हे केल्याचे कबुल केले.

त्याचेकडुन भारती विद्यापीठ ३, सहकारनगर २,मुढवा २,हडपसर, बिबवेवाडी, सिंहगड, वाकड, दिघी व कोंढवा प्रत्येकी १ असे एकुण १२ घरफोडी चोरीचे व एक वाहनचोरीचा असे १३ गुन्हे उघडकीस

आणुन त्याच्या कडुन किंमत रुपये १२ लाख ६७ हजार ८२० रुपयांचे २२७.६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे व १४०५ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागीने,

व ४०,००० हजार रूपयांची अँक्टीवा गाडी असा १३ लाख ७ हजार ८२० रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला.

त्याच्याकडून आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप युनिट-२ गुन्हे शाखा पुणे शहर,

पोलीस उपनिरीक्षक आनंदराव पिंगळे, यशवंत आंब्रे, पोलीस कर्मचारी किशोर वग्गु, आस्लम खान पठाण, चेतन गोरे, गजानन सोनुने,

निखील जाधव, समिर पटेल, कादीर शेख, चंद्रकांत महाजन, विवेक जाधव, अजित फरांदे, उत्तम तारु व गोपाळ मदने यांनी केली आहे.

Advertisement
Share Now