महिलेचे अपहरण करून विनयभंग केल्याप्रकरणी ५ जणांविरुद्ध विश्रांतवाडी पोलीसांना गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश,

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : ६ फेब्रुवारी रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास महिला जॉब करत असलेली ऑफिस मधून सुटल्यानंतर तिच्या मित्रासोबत नेहमीप्रमाणे विश्रांतवाडी येथे येण्यासाठी निघालेअसता फिर्यादीच्या पती व त्याचे दोन गुंड मित्रांनी तिला तसेच तिच्या

मित्राला बेदम मारहाण केली फिर्यादीला जबरदस्तीने तिच्या गाडीवर बसवले तसेच फिर्यादीची गाडीची चावी काढून घेतली त्यानंतर फिर्यादीच्या पतीने व त्याच्या मित्राने फिर्यादीला जबरदस्ती कॅम्प पुणे भागात आणले रस्त्या मध्ये आरोपींनी गाडी चालवत असताना मी तुझा बलात्कार करेन

तू लय सेक्सी आहे. असे बोलून तिचा हात पकडला फिर्यादीला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले तसेच तिच्या किडनॅप करून दादागिरी ने तिला कॅम्प विक्टरी सिनेमा जवळ आणून महिलेला शिव्या देऊन जीवे ठार मारण्याच्या धमक्या दिली.

पीडित महिलेने तिचा पती राहुल भालेराव व पतीचे गुंड मित्र यांच्याविरोधात संबंधित पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली तसेच पोलिस आयुक्त पुणे यांना देखील लेखी स्वरूपात तक्रार दाखल केली होती.

परंतु पोलिसांनी पीडित महिलेची तक्रारीवर कोणतीही दखल घेतली नाही म्हणून पीडित महिलेने एडवोकेट साजिद शहा तसेच एडवोकेट एच एच खान यांच्यामार्फत खडकी कोर्टात खाजगी फिर्याद दाखल केली.

कोर्टाने फिर्यादीच्या वकिलांचे युक्तिवाद ऐकून विश्रांतवाडी पोलिस ठाण्याला भारतीय दंड विधान कलम ३६४, ३५४,३५४क, ४९८अ, ३२३,४०६,५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले आहे.फिर्यादी महिले तर्फे एडवोकेट साजिद शहा तसेच एडवोकेट एचएच खान हे काम पाहत आहे

Advertisement
Share Now