गोळ्या झाडून पसार झालेल्या आरोपींना न्यायालयाने दिली पोलीस कस्टडी
Police custody : बांधकाम व्यावसायीक यशवंत कांबळे यांच्या सांगण्यावरुन अमित मिलींद सरोदेचा खून

Police custody : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : दोन दिवसा पुर्वी शाहु वसाहत येथे भर रस्त्यात गोळ्या झाडून व कोयत्याने सपासप वार करून खून करण्यात आला होता.
खून करुन आरोपी पसार झाल्याने पोलिसांसमोर पेच निर्माण झाले होते . पोलिसांनी १२ तासांतच आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
आरोपींनी दिलेल्या जबाबातून सदरील खूनाच्या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे.
दत्तवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील शाहु वसाहत लक्ष्मीनगर पर्वती पुणे येथे बांधकाम व्यावसायीक
यशवंत कांबळे यांच्या मुलीवर प्रेम करणा-या अमित मिलींद सरोदे (रा.जनता वसाहत )
या युवकाला कांबळे यांच्या सांगण्यावरुन आदर्श मधुकर ननावरे (वय २३ वर्षे, रा.स.नं.३०, प्रभात प्रेस शेजारी, धायरी पुणे)
व बोंबल्या ऊर्फ अभिजीत काळे (वय २२ वर्षे, रा.२१४, पटेल नगर बिल्डींग, दांडेकर पुल पुणे)
या दोघांनी मिळून अमित सरोदे याचा पिस्टलने फायरिंग व कोयत्याने वार करुन खुन करून आरोपी फरार झाले होते.
आत्महत्या करण्या अगोदर हडपसर पोलिसांनी युवकाला घेतले ताब्यात,
सदरील गुन्हयामध्ये १२ तासामध्ये अटक करुन पुढील तपासकरण्याकरीता न्यायालयात हजर केले होते,
त्यांना पोलीस कस्टडी मिळावी या करीता सरकारी वकील सुरेखा क्षिरसागर यांनी न्यायालयात मागणी केली .
आरोपीकडे पिस्टल व कोयता कोठुन आला , त्याला तो कोणी दिला, आरोपींनी गुन्हा केल्यानंतर कोठे आश्रय घेतला होता,
त्यांना गुन्हा करण्यास कोणी, प्रवृत्त केले होते त्याकरीता त्यांनी नियोजन कोठे केले होते. सर्व बाबींवर अधिक तपास करण्या करीता पोलीस रिमांडची मागणी केली होती.
त्यानुसार आरोपींना पुढील ३ दिवसाकरिता पोलीस कस्टडी रिमांड मंजुर झाला आहे. गुन्हयाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास घेवारे करत आहे.
विकास दुबेचा एन्काऊंटरमध्ये खात्मा
Pingback: (Hadapsar police) आत्महत्या करण्या अगोदर हडपसर पोलिसांनी घेतले ताब्यात