पुणे कॅन्टोमेंट बोर्डाच्या नगरसेवक विवेक यादवला बबलू गवळी सुपारी प्रकरणात अटक,

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement

(corporator Vivek Yadav arrested) कोंढवा पोलीसांनी गुजरात बॉर्डरवरून घेतले ताब्यात.

(corporator Vivek Yadav arrested) पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे :

बदला घेण्यासाठी बबलू गवळीचा( Bablu gawli) खातमा करण्यासाठी सुपारी देणा-या भारतीय जनता पार्टीच्या

पुणे कॅन्टोमेंट बोर्डाच्या नगरसेवक विवेक यादवला ( Pune cantonment corporator Vivek Yadav ) कोंढवा पोलीसांनी अटक केली आहे.

यापूर्वी खुनाची सुपारी घेणाऱ्या दोन किलरला कोंढवा पोलीसांनी अटक केली आहे.

कोंढवा पोलीसांनी खुनाचा कट उधळत सुपारी शुटर राजन जॉन राजमनी वय ३८, रा. भाग्योदयनगर, कोंढवा

व इब्राहिम उर्फ हुसेन याकुब शेख वय २७, रा.वाकड यांना अटक केली होती.

२०१६ मध्ये यादव याच्यावर गणेशोत्सव काळात रात्री गोळीबार झाला होता.

हा गोळीबार सराईत गुन्हेगार बबलू गवळी (Bablu Gavli) याने केला होता. या दोघांमध्ये पूर्ववैमनस्य आहे.

वाचा : कोंढव्यातील क्लब 24 हुक्का बारवर पोलीसांचा छापा,

त्यातून हा गोळीबार झाला होता. या गोळीबाराचा आणि दुष्मनीतून विवेक यादव याने राजमनीला बबलू गवळी याच्या खुनाची सुपारी दिली होती.

त्याला कुठे व कशा पद्धतीने ठार मारायचे हे देखील ठरले होते. त्याबाबत कॉल आणि चॅटिंगद्वारे या दोघांचे बोलणे झाले होते.

बबलू गवळी हा कोरोनाच्या जामिनावर कारागृहा बाहेर आहे.

त्याला या काळात ठार मारायचे होते. पण, ही माहिती पोलिसांना मिळाली व खुनापूर्वीच हा कट उधळला गेला.

राजमनी यांच्याकडून ३ पिस्तुल व ७ काडतुसे असा साठा कोंढवा पोलीसांनी जप्त केला होता. विवेक यादव व त्याचा साथीदार पसार होते.

या दोघांचा शोध गेल्या काही दिवसांपासून सुरू होता. तीन वेगवेगळी पथके आणि गुन्हे शाखा त्याचा तपास सुरू होता.

मात्र तो सापडत नव्हता. कोंढवा पोलिसांच्या पथकाला विवेक यादव हा गुजरातला (Gujarat) असल्याची माहिती मिळाली.

या पथकाने येथे धाव घेत त्याला बॉर्डरवरून पकडले आहे. त्याला पुण्यात आणले जात आहे.

दरम्यान अद्याप देखील विवेक यादव याचा साथीदार आणि पिस्तुल पुरवणारा सापडलेला नाही.

त्याचा शोध घेतला जात आहे. पुढील तपास कोंढवा पोलिस ठाण्याकडून सुरू आहे.

वाचा : कोंढवा खुर्द येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन.

Advertisement
Share Now