सह्याद्री रुग्णालयात करोनाबाधित महिलेचा विनयभंग

Sahyadri hospital : आय. सी. यु. मध्ये दाखल असलेल्या 35 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा वार्डबाॅय कडून विनयभंग

corona-patient-molested-at-sahyadri-hospital

Sahyadri hospital :पोलीस न्यूज24 प्रतिनिधी: सध्या देशभर कोरोणाचा प्रसार वाढत असताना नागरिक जीव वाचविण्यासाठी पळापळ करत आहे,

creat a new website 4999 ₹Digital visiting cardcreat a new website 9999 ₹

आपल्या रुग्णांना दवाखान्याच्या भरोश्यावर सोडून नागरिक निश्चिंत पणे रहात असून अश्या प्रकरणांमुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.

नुकतेच हडपसर येथील सह्याद्री हॉस्पिटल मध्ये एका 35 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह महिलेला आय. सी. यु. मध्ये दाखल करण्यात आले होते.

लॉकडाऊनमध्ये पकडलेली बस सोडण्यासाठी घेतलेल्या लाचप्रकरणी बिबवेवाडी पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले निलंबित

सदर महिला आय. सी. यु.मधिल बेडवर आराम करत असताना, वार्डबाॅय अशोक नामदेव गवळी (वय 40 वर्षे, रा. सर्वे नं. 41, नवरत्न सोसायटी, भाजी मंडई शेजारी, वडगावशेरी, पुणे.)

Advertisement

हा सायंकाळी 5 च्या सुमारास पी. पी. किट घालून सदर महिलेच्या बेड जवळ उभा राहिला व स्वतःच्या चेहऱ्यावरील मास्क खाली घेऊन म्हणाला,

” मला ओळखले का”, तेव्हा सदर महिलेने नाही असे उत्तर दिले,व अरोपीकडे दुर्लक्ष केले.

पण त्याच वेळेस वार्डबाॅय अशोक गवळी हा महिलेच्या बेड जवळ येऊन जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागला व मोबाईल नंबर मागु लागला,

तेव्हा सदर महिला वॉर्डबॉय अरोपीस म्हणाल्या, “बाजुला व्हा”. तेव्हा वार्डबाॅय अरोपीने महिलेस लज्जा उत्पन्न होईल असेल वर्तन केले.

Advertisement

केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांना करोनाची लागण, मेदांता रुग्णालयात दाखल

तेव्हा सदर ठिकाणी एक महिला आल्याने तिने अरोपीस अशोक तु इथे काय करतोस असे म्हणाली असता तेव्हा अरोपी हा त्या ठिकाणाहून पळून गेला व पुढील अनर्थ टळला.

यामुळे हडपसर व सह्याद्री हॉस्पिटल परीसरात खळबळ उडाली आहे. तसेच रुग्णालयातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सदर महिलेच्या तक्रारीवरून हडपसर येथील सह्याद्री हॉस्पिटल मधील वार्डबाॅय याच्या विरुद्ध

Advertisement

1 ऑगस्ट रोजी भा. दं. वि. कलम 354 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर प्रकरणाचा तपास हडपसर पोलीस स्टेशनचे पो. उप निरीक्षक आर. आर. पाटील करत आहे.

One thought on “सह्याद्री रुग्णालयात करोनाबाधित महिलेचा विनयभंग

Comments are closed.

%d bloggers like this: