भाजपचे नगरसेवक माजी सभागृह नेते धिरज घाटे यांच्या हत्येचा कट उघडकीस, ३ जणांना अटक.

ebook.trendingstudysajagnagrikktimes.sajag-advertisement-offer
Advertisement

येत्या निवडणुकीमुळे करण्यात येणार होती हत्या?

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : पुणे शहरातील भाजपाचे नगरसेवक व माजी सभागृह नेते धिरज घाटे यांच्या हत्येचा कट उघडकीस आला आल्याने पुणे शहरात खळबळ उडाली आहे.

निवडणुकीला काही महिने राहिले असल्याने असा प्रकार उघडकीस आल्याने चर्चेला उधाण आले आहे.

याप्रकरणी धिरज घाटे यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून त्या तक्रारीवरून विकी उर्फ वितुल वामन क्षिरसागर, मनोज
संभीजी पाटोळे रा. सानेगुरूजी नगर आंबीलओढा कॉलनी या
दोघांसह त्यांच्या तीन ते चार साथीदारांच्या विरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास शेफ्रॉन हॉटेल नवी पेठ शास्त्री रोड परिसरात घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घाटे शुक्रवारी दुपारी चहा पिण्यासाठी शेफ्रॉन हॉटेलमध्ये गेले होते.

त्यावेळी त्यांचा जुना कार्यकर्ता विकी क्षिरसागर हा देखील त्याच्या काही साथीदारांसोबत तेथे आला होता. घाटे यांचे कार्यकर्ते त्याच्याबरोबर संपर्क ठेवत नाहीत, बरोबर जात नाहीत म्हणून तो मागील काही दिवसापासून रागात होता.

दरम्यान आगामी कालावधीत होणाऱ्या महापालिकेच्या नगरसेवक पदाच्या निवडणूकीत त्याचा भाऊ राकेश क्षिरसागर हा सहज निवडून यावा म्हणून ४ ते ५ साथीदारांना एकत्र करून घाटे यांच्या खूनाचा कट रचून शेफ्रॉन हॉटेलमध्ये त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी आला होता.

याबातची माहिती घाटे यांना मिळाल्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता हा प्रकार समोर आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पाच ते सहा जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
.

Advertisement
Share Now