गायीच्या तुपात भेसळ करताना उघड : लाखो रुपयांचा माल जप्त,

गायीचा १४९९ किलो तुप जप्त.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : गायीच्या तुपामध्ये भेसळ करून नागरिकांच्या जीवाशी खेळणा-या महाभागांना भारती विद्यापीठ पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

creat a new website 4999 ₹creat a new website 9999 ₹Digital visiting card


तपास पथकांचे अधिकारी नितीन शिंदे व कर्मचारी असे अभिनव कॉलेज, आंबेगाव परिसरात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस,

कर्मचारी राहूल तांबे व सचिन पवार यांना त्यांच्या बातमीदारमार्फत कळाले कि,अभिनव कॉलेज समोर एक मेगा एक्सल कंपनीचा टेम्पो नंबर एम. एच. १२.आर. एन. २४५० टेम्पो भेसळ्युक्त गायीचे,

तुपाचे डब्बे विक्री करण्यासाठी येणार असल्याचे माहीती प्राप्त झाली. सदरील प्रकार भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे प्रभारी,

Advertisement

अधिकारी जगन्नाथ कळसकर व पोलीस निरीक्षक गुन्हे अर्जुन बोत्रे यांना सांगितला असता त्यांनी सापळा रचून संशयितास ताब्यात घेण्याचे आदेश दिले.

टॅम्पो ताब्यात घेतला असता टॅम्पोमधील १५ किलो वजनाचे १०० पत्र्याचे चौकोनी डब्बे होते. डब्यामध्ये काय आहे.

याबाबत विचारणा करता त्यांनी गायीचे तुप असल्याचे सागितले. सदर डब्बांवर कोणतेही कंपनीचे नाव ,आयएसआय मार्क,

डब्ब्यातील आतील वस्तुचे वर्णन अशी माहीती असे काहीही नमुद नव्हते. तुप घेवून जाणाऱ्याला त्याच्या नावाची विचारपूस केली असता शिवराज हळमणी, मु. पो. हात्तीकनबस, ता. अक्कलकोट,

Advertisement

जि. सोलापुर असे असल्याचे सांगितले व डीजीएम ( देवक फुडस कंपनी), शिवणे, पुणे येथील कंपनीतुन माल घेतला असल्याचे सागितले.

सदरचे तुप भेसळयुक्त असल्याचे संशय आल्याने लागलीच सहा आयुक्त,अन्न व औषध प्रशासन पुणे विभागातील क्रांती विठठल बारवकर अन्न सुरक्षा अधिकारी यांना संपर्क केला असता त्यांनी व,

त्यांचे सहकारी यांनी भारती विद्यापीठ पोलीसांच्या मदतीने अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ अर्तगत पुढील कारवाई करुन १४९९ किलो गायीचे तुप किमत ४ लाख ४९ हजार ७०० रुपयेचेमाल जप्त केले आहे.


सदरची कारवाई डॉ. प्रियंका नारनवरे पोलीस उप आयुक्त परिमंडळ १,सरजेराव बाबर सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर,अर्जुन बोकत्रे,पोलीस निरीक्षक(गुन्हे),

Advertisement

यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकांचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक नितीन शिंदे,पोलीस अंमलदार संतोष भापकर‌,

सोमनाथ सुतार, रविन्द्र भोसले, सर्फराज देशमुख, सचिन पवार, अभिजीत जाधव, गणेश शेंडे, राहूल तांबे, व विक्रम सावंत यांनी कारवाई केलेली आहे.

%d bloggers like this: