फिर्यादीला पोलिसांनीच गंडविलायाची न्यायालयात तक्रार!

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement

न्यायलयाने कारवाईचा अहवाल मागितला पोलीस आयुक्तांना.

पुणे : वारजे माळवाडी येथे दाखल जबर चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस मदत करून साक्षीदारांवर दबाव टाकून फिर्यादीचे दाखल गुन्ह्यात योग्य तपास न करता त्याउलट वृत्तपत्रात फिर्यादीचीच बदनामी करणारा मजकूर प्रसिद्ध करणाऱ्या वारजे पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी व तपास

अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले समवेत आरोपी अनमोल सुभाष झोंबाडे रा. पानमळा झोपडपट्टी दत्तवाडी पुणे व वैभव आनंदराव गादे रा. पिंपळे सौदागर झोपडपट्टी पुणे यांचे विरुद्ध तपासात पक्षपात करून आरोपीस मदत केलेप्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात फिर्यादी अलका फडतरे यांनी ऍड विजयसिंह ठोंबरे व ऍड हितेश सोनार यांचे मार्फत तक्रार दाखल केली होती.

प्रस्तुत प्रकरणात न्यायालयाने पोलीस आयुक्त यांनी सदर घटनेबाबत लेखी अहवाल सादर करण्याचे आदेश पारित केलेले आहे. हकीकत अशी की २२ जून २०२१ रोजी अलका फडतरे ह्या वारजे येथे जात असताना एक अनोळखी महिला व पुरुष यांनी त्याची दुचाकीवरून गंठण जबर चोरी करून नेले होते.

त्यावेळी सदर घटना ही गौतम यादव या साक्षीदाराने बघितल्याने त्यांनी फिर्यादी महिलेसह वारजे माळवाडी पोलीसांकडे धाव घेऊन सदर गाडीचा नंबर एम एच ३७ यू ०२७९ असल्याबाबत सांगितले होते.

त्यानुसार वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद घेण्यात आली होती.परंतु तपासादरम्यान साक्षीदारास सुमारे दोन दिवस पोलीस ठाण्यात डांबून ठेवून आरोपी महिला अनमोल झोंबाडे व तिचा प्रियकर वैभव गडदे यांचे सांगण्यावरून त्यास जबर मारहाण करून त्याला पोलिसांकडे खोटा जबाब देण्यास प्रवृत्त केले होते.

सदर बाब फिर्यादी अलका फडतरे यांना कळताच त्यांनी तात्काळ पोलीस आयुक्त पुणे यांना सदर प्रकरणा बाबत कळविले होते.साक्षीदारांवर दबाव टाकून त्यांस आरोपींनी पोलिसाना पैसे दिले असून ते त्याचे ओळखीचे आहे आणि त्यांच्याविरुद्ध कारवाई करणार नाही असे सांगत जबाब पालटण्यासाठी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याबाबत चे प्रतिज्ञापत्र साक्षीदार गौतम यादव यांनी न्यायालयात सादर केले आहेत.

तसेच त्याचे जिवाचे काही बरेवाईट झाल्यास आरोपी व संबंधित पोलिस जबाबदार धरण्यात यावे असे सदर प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहेत.

आरोपी महिला ही फिर्यादीची सुन असुन सोबत असलेला पुरुष हा तिचा प्रियकर असल्याने सूड घेण्याच्या भावनेतून त्यांनी फिर्यादी यांस मारहाण करून त्यांचे सोन्याचे आभूषण चोरी केल्याची बाजू फिर्यादी यांनी न्यायालयात मांडली आहे.

तसेच फिर्यादी व त्यांचे कुटुंबीयांची बदनामी करण्यासाठी पोलिसांशी हातमिळवणी करून सदर महिला ही फिर्यादी यांस त्रास देण्यासाठी नेहमी तत्पर असते व आरोपीचे विरुद्ध यापूर्वीसुद्धा फिर्यादी यांनी अनेक गुन्हे नोंदविले असून तपास यंत्रणेद्वारा तपासात दाखवल्या जाणाऱ्या उदासीनतेमुळे त्यांच न्यायापासून वंचित राहावे लागत असल्याची बाब फिर्यादी अलका फडतरे यांच्या तर्फे ऍड विजयसिंह ठोंबरे यांनी न्यायालयात बाजू मांडली आहे.

सदर प्रकरणात न्यायालयाने संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकार्‍यास व तपास अधिकाऱ्यांना त्यांचे म्हणणे सादर करण्याची मुभा देऊन सुद्धा त्यास त्यांनी प्रतिसाद न दिल्यामुळे न्यायालयाने पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी सदर घटनेबाबत चा लेखी अहवाल सादर करण्याबाबतचे आदेश पारित केलेले आहेत. फिर्यादीतर्फे ऍड विजयसिंह ठोंबरे, ऍड हितेश सोनार, ऍड अभिजित सोलनकर व ऍड अक्षय वाडकर यांनी काम पाहिले आहे. सदरील माहिती एॅड ठोंबरे यांनी दिली आहे.

Advertisement
Share Now