मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पुणे कोर्टाकडून समन्स
Chief Minister Uddhav Thackeray News : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पुणे कोर्टाकडून समन्स

Chief Minister Uddhav Thackeray News : Police News 24 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पुणे कोर्टाकडून समन्स बजावण्यात आले आहे.
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधून भारताचा उल्लेख “हिंदुस्तान” केल्याने पुणे कोर्टाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या विरोधात
हेमंत पाटील यांनी ऍडव्होकेट वाजिद खान बिडकर मार्फत याचिका दाखल केली .
या याचिकेवर कोर्टाने दोघांनाही समन्स बजावले आहे.दैनिक सामनामधून वारंवार भारताचा उल्लेख ‘हिंदुस्थान’ असा केला जातो.

यावर सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी आक्षेप घेत पुणे न्यायालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्याविरोधात पुणे न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
पुणे न्यायालयाने सोमवारी ही याचिका दाखल करून घेत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत या दोघांना समन्स बजावला आहे.
या दोघांनाही 1८ फेब्रुवारीला पुणे न्यायलायात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हेमंत पाटील यांनी ऍडव्होकेट वाजिद खान बिडकर मार्फत पंधरा दिवसांपूर्वी ही याचिका दाखल केली होती.
Pingback: (Police arrest motorcycle thieves ) मोटर सायकल चोरणारा गजाआड