इसके बाद हमारे एरीया में दिखनेका नही,दिखा तो हाथ-पैर तोड देंगे” अशी धमकी देवुन मारहाण,

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement

(wanwadi police station News) वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

(wanwadi police station News) पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : आजकाल स्वतःच्या जागेत जाणे देखील गुन्हा ठरत आहे ?

स्वताच्या जागेत गेले असता एका २८ वर्षीय तरुणाला महंमदवाडी येथे बेदम मारहाण करण्यात आली आहे.

तक्रारदाराने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांचे मौजे महंमदवाडी स.नं ८५, लक्ष्मीनगर महंमदवाडी हडपसर येथे प्लॉट आहे.

प्लॉटवर गेले असता ६ ते ७ साथ जण तेथे येऊन “तुम लोग हमारे एरीया मे आनेका नही” असे म्हणुन त्यांचे हातातील लोखंडी पाईप,

प्लॅस्टीक पाईप व हॉकी स्टीकने फिर्यादी यांचे पाठीवर डाव्या हाताचे खांदयावर,

उजव्या पायाचे मांडीवर, कमरेवर उजव्या बाजुला, डाव्या पायाचे पोटरीव मारहाण केली.

वाचा : तलवारीने केक कापून बर्थडे साजरा करणाऱ्यांना पोलीसांनी केली अटक,

तसेच त्यांचे हातातील हत्यारांसहीत येवुन आरडा-ओरड करुन परिसरात दहशत माजवली .

दहशतीने नागरीकांनी त्यांची घरे बंद करुन घेतली.

त्यानंतर फिर्यादी यांना मोटर सायकलवर बसवुन वाडकर मळयाकडे जाणा-या रोडवर सुनसान ठिकाणी नेवुन पुन्हा मारहाण करून,

फिर्यादी यांचे खिशातील पाकीटा मधील ५ हजार रुपये जबरदस्तीने काढुन घेवुन,

“इसके बाद हमारे एरीया में दिखनेका नही,दिखा तो हाथ-पैर तोड देंगे” अशी धमकी देवुन निघुन गेले.

आणि फिर्यादी यांचे मित्र यांचेही कमरेवर,दोन्ही हातावर व दोन्ही पायावर मारहाण करून जखमी केले आहे.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विष्णु वाडकर करीत आहेत.

वाचा : कामे न करता बिले काढल्या प्रकरणी भवानी पेठेतील उपअभियंता टूले निलंबित तर कनिष्ठ अभियंत्याची खातेनिहाय चौकशी शुरू

Advertisement
Share Now