भारतीय तलवारबाजी महासंघाचे माजी सचिवांविरोधात गुन्हा दाखल

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement

Indian fencing federation : राज्य कर निरीक्षक म्हणुन शासनाच्या सेवेत रुजू होण्याकरीता दिशाभुल करणारे सादर केले कागदपत्रे

Indian Fencing Federation : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : पुण्यातील येरवडा येथील क्रिडा व युवक सेवा पुणे विभाग कार्यालयाची दिशाभूल करून

फसवणूक केल्याप्रकरणी भारतीय तलवारबाजी महासंघाचे माजी सचिव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वियज संतान,वय-५४ प्र.उपसंचालक,क्रिडा व युवक सेवा पुणे विभाग पुणे यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी हे प्रभारी उपसंचालक या पदावर क्रिडा व युवक सेवा पुणे विभाग,

पुणे येथे कार्यरत असुन त्यांचे कार्यालय जे काही उमेदवार शासकिय सेवेत खेळाडु आरक्षण अंतर्गत अर्ज करतात.

त्यापुर्वी उमेदवारांनी खेळ प्रमाणपत्राची वैधता कार्यालयाकडुन करवून घेण्सा संबधीचे कामकाज फिर्यादीचे कार्यालयाकडुन केले जाते.

यातील आरोपी याने ११ वी वरिष्ठ राष्ट्रीय तलवार बाजीत सहभागी नसताना तसेच सदर स्पर्धेत ईपी या गटात कर्नाटक संघास सुवर्ण मणिपुर संघास रौप्य मध्य प्रदेश व आंध्र प्रदेश कांस्य पदक सांधिक प्रकारातून मिळालेचे निर्दशनास आले.

महाराष्ट्र संघाने ईपी या क्रिडा प्रकारात प्राविण्य संपादन केले नसल्याचे स्पष्ट होते.

वाचा : सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्या प्रकरणी FIR दाखल,

तर वरील सर्व प्रकरणावरुन आरोपीने राज्य कर निरीक्षक म्हणुन शासनाच्या सेवेत रुजू होण्याकरीता दिशाभुल करणारे कागदपत्र सादर केले.

तसेच त्याचेकडील अभिलेखाची पाहणी न करता दिशाभुल करणारे बनावट प्रतिज्ञापत्र तयार करुन देवून,ते खरे असल्याचे भासवून,

सदर बनावट खेळाडु प्रमाणपत्र राज्य कर निरीक्षक म्हणुन शासनाच्या सेवेत नोकरी मिळविण्यासाठी वापरात आणले आहे.

या संदर्भात येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक समीर करपे करीत आहे.

VIDEO : गणेश मूर्ती विसर्जन पाण्याच्या कंटेरनात की कच-याच्या कंटेरनात ? महापौरांनी दाखविला दोघांमधिल फरक

Advertisement
Share Now