पुन्हा चोरी करण्यासाठी आला आणि पोलिसांच्या जाळयात अडकला,

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement

३ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : पुन्हा घरफोडी करण्यासाठी आला आणि पोलिसांच्या जाळ्यात रेकॉर्डवरील चोर अडकला, गुन्हे शाखा युनिट २ कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश मोरे तपास करीत असताना पोलीस अंमदार गजानन सोनुने व कादीर शेख यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, घरफोडी चोरी करणारा गुन्हेगार रफिक हुसेन शेख हा के.के.मार्केट पाकींग मध्ये थांबला असुन,

त्याकडे लाल रंगाची TVS मोपेड गाडी आहे व तो घरफोडी चोरी करण्यासाठी वापरण्यात येणारी लोखंडी कटावणीसह घरफोडी चोरी करण्याचे तयारीने आला असल्याची बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील युनिट २ यांना कळविले असता त्यांनी प्रकाश मोरे यांना कायदेशिर कारवाई करण्याचे आदेश दिले.

प्रकाश मोरे, पोलीस अमंदार उत्तम तारु, गजानन सोनुने, निखील जाधव, समीर पटेल,कादीर शेख असे के. के. मार्केट सहकारनगर पुणे येथील पार्किंगमध्ये जावुन गुप्तपणे पहाणी करुन, रफिक हुसेन शेख वय २६ वर्षे रा. चिंतामणी नगर, गल्ली नं. ३ बी, सय्यदनगर हडपसर यास शिताफिने ताब्यात घेतले आहे.

त्याचेकडे सखोल तपास केला असता,त्याने नुकतीच चार-पाच दिवसापुर्वी धनकवडी, सहकारनगर भागात घरफोडी चोरी केल्याचे सांगितले, त्याने २ घरफोडी चोरीचे गुन्हे तसेच २ वाहन चोरीचे गुन्हे केल्याचे कबुल केले आहे.

त्याचे ताब्यातुन रोख १ लाख ६० हजार रोख ३२.२९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, तसेच गुन्हयात वापरलेली गाडी सह इतर दोन चोरीच्या गाड्या, घरफोडी चोरी करण्यासाठी वापरलेले सायकलचे स्टॅन्ड (कटावणी) असा ३ लाख ८५ हजार ३५५ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


रफिक शेख हा रेकॉर्डवरील असुन तो काही दिवसापुर्वीच जेलमधुन जामिनावर बाहेर आल्यावर त्याने हे गुन्हे केलेले आहेत. त्याचेवर एकुण ३६ गुन्हे दाखल आहे.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्तअमिताभ गुप्ता,पोलीस सह-आयुक्त,डॉ.रविंद्र‌ शिसवे,प्रभारी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) भाग्यश्री नवटक्के,पोलीस उप-आयुक्त श्रीनिवास घाडगे,लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील,

सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश मोरे,वैशाली भोसले, पोलीस अंमलदार यशवंत आंब्रे, उत्तम तारु, गजानन सोनुने, कादीर शेख, निखील जाधव, समिर पटेल, किशोर वग्गु, साधना ताम्हाणे, चंद्रकांत महाजन, मितेश चोरमोले, चेतन गोरे, संजय जाधव, करण ढंगारे यांनी केली आहे.

Advertisement
Share Now