दारु उधारीने न दिल्याने बियर बार चालकाला मारहाण : परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न,

ebook.trendingstudysajagnagrikktimes.sajag-advertisement-offer
Advertisement

मेडिकल चालकालाही मारहाण करीत ३ हजार चोरून नेले.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : गुन्हेगारांनी शहरात हौदोस घातला असुन किरकोळ किरकोळ कारणावरून हत्यारे हतात घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काळेपडळ येथे काहि गुन्हेगारांनी एकत्र येऊन काही दुकाने फोडून दहशत निर्माण करून पैसे चोरून नेल्याची घटना घडली आहे.

काळेपडळ येथील एस.के बियर शॉपीतील मॅनेजर यांना उधारीवर बियर मागून,त्यांनी बियर उधारीवर दिली नाही म्हणुन प्रतीक ऊर्फ नन्या याने शिवीगाळ करुन त्याचे इतर साथीदारांनी त्यांच्या,

हातातील दांडक्यांने काऊंटरच्या काचेवर मारुन तोडफोड करुन,तसेच लोखंडी कोयत्याने दुकानातील बियरचे बॉटल,

फ्रिज,काऊंटरची काच फोडून,बियर शॉपी दुकानाचे नुकसान केले. त्यावेळी बियर शॉपी शेजारील श्री मेडीकलचे मालक सुरज सुतार,वय-२२ वर्षे, रा. काळेपडळ हडपसर,

हे भांडणे पाहत असताना तु काय इथे उभा राहुन तमाशा बघतोय काय असे म्हणुन लोखंडी कोयता घेवून, सुतार यांच्या मेडीकल दुकानाचे काऊंटरवर व समोरील काचेवर मारुन काच फोड़ून,

त्याने काऊंटर मधील गल्ल्यातील ३ हजार ८०० रुपये जबरदस्तीने काढुन घेतले. सुतार हे त्यास विरोध करीत असताना,

त्याने त्याचे हातातील लोखंडी कोयता उलटा करुन , सुतार यांच्या उजवे हातावर व पोटावर डावे बाजुस मारुन जखमी करुन,

ढेरे कंपनीकडे जाणा-या रोडवरील सलुनचे दुकान,किराणा दुकान,चिकनचे दुकानांची तोडफोड करुन, सदर परिसरात,

आरडा-ओरडा करुन,त्यांचे हातातील लोखंडी कोयते व दांडके हवेत फिरवून,आम्हीच इथले दादा आहे,आमचे नादाला लागु नका,

आमचे नादाला लागले तर तुमचे हात-पाय तोडुन टाकीन असे म्हणुन धमकी देऊन जात असताना,सदर परिसरातील सर्व दुकानदारांनी आप-आपली दुकाने घाबरुन पटापट बंद करून सैरावैरा धाऊ लागले.

सदरील घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी धाव घेतली असता स्वतला भाई म्हणणारे भाई पळून गेले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जोगदंड‌ करीत आहेत.

Advertisement
Share Now