विनामास्क कारवाई करताना पोलीस हटकले, त्या पोलीसाला तिघांनी बदडले,
Beating police :समर्थ पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्याने दिली फिर्याद.
Beating police : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे :
सध्या पुणे शहरात सर्वात जास्त कारवाई केली जात आहे ती म्हणजे विनामास्क फिरणाऱ्यांवर,
पोलीसांकडून कारवाईचा फार्स आवळण्यात आला असून चौका चौकात वाहने अडवून कारवाई केली जात आहे.
या मधूनच बऱ्याच वेळा नागरिकांमध्ये व पोलीसांमध्ये वादावादीचे रूपांतर भांडणात होत आहे.
असाच वादावादीचा प्रकार विकोपाला गेल्याने पोलिसाला मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे.
वाचा >४ लाखांचे कर्ज मंजुर करुन दुसऱ्या बँकेच्या खात्यात ट्रान्सफर करत फसवणुक,
नाना पेठेत कारवाई करत असताना रागातून तिघांनी पोलिसाला मारल्या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
रितेश नंदकुमार कासट (वय ४३) व कृष्णा मल्लप्पा अंतरगंगी (वय २५) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
त्यांचा आणखीन एक साथीदार अक्षय सुरेश बेगरुट वय २७ सर्व रा. नाना पेठ हा फरार झाला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई विजय भोसले यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वाचा > कोरोनामुळे नागरिक त्रस्त नगरसेवक पार्टीत मस्त,