मी या भागातला भाई आहे हे तुला माहित नाही का असे म्हणत नाना पेठेत एकाला मारहाण,

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement

भाई म्हणा-यार समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : सध्या पुणे शहरात छोट्या छोट्या कारणांवरून भांडणे होताना दिसत आहे. तर काहींच्या डोक्यात दारू चढल्यावर भाईगिरी करून स्थानिकांना त्रास दिला जात आहे.


असाच प्रकार पुण्यातील नाना पेठेत एकाला मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे.

मारहाण केल्याप्रकरणी यासीम शेख,वय-२५ वर्ष,रा.नाना पेठ,पुणे यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने योगेश निवृत्ती डोंगरे वय-२७,रा.नाना पेठ, याला व त्याचे इतर साथीदारांना अटक करण्यात आली आहे.

नाना पेठेतील अशोक चौकात शेख हे रोडच्या कडेला पार्क केलेल्या रिक्षामध्ये बसले असताना शेख यांचे परिचयाचा व त्यांचेच परिसरात राहणारा आरोपीने शेख यांना बाजुच्या गल्लीत सोबत नेवुन त्यांना शिवीगाळ करून तुमचा माज मोडला पाहिजे मी या भागातला भाई आहे.

हे तुला माहित नाही का,तु आम्हाला किंमत देत नाही. असे
म्हणुन हाताने लाथा-बुक्यांनी मारहाण केली.

तसेच इतर आरोपींनीही लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून यासीन शेख यांचे डोक्यात, पाठीवर व हाता- पायावर लाकडी बांबुने मारहाण केली. सदरील घटनेचा तपास समर्थ पोलीस करीत आहे.

Advertisement
Share Now