दीपक मारटकर खून प्रकरणात गुंड बापू नायर ला अटक

(Bapu Nair arrested ) बापू नायरवर मोक्कानुसार कारवाई केली गेल्यांनी सध्या तो कारागृहात आहे.

(Bapu Nair arrested) पोलिस न्यूज 24:

creat a new website 4999 ₹creat a new website 9999 ₹Digital visiting card
Bapu Nair arrested in Deepak Maratkar murder case

पुणे : कुविख्यात गुंड बापू नायर (रा. इंदिरानगर) याला युवा सेनेच्या दीपक मारटकर खूनप्रकरणात अटक करण्यात आली आहे.

फरासखाना पोलिसांनी आज बापू नायर ला कारागृहातून अटक केली आहे .

फरासखाना पोलीस ठाण्यात दीपक मारटकर यांचे खून प्रकरणी गुन्हा दाखल आहे.

Advertisement

या पूर्वी या गुन्ह्यात दहा जणांना अटक करण्यात आले होते.

वाचा : चोराशी रोमॅन्टिक चॅटिंग करून प्रेमात पाडले ,व नंतर त्याला तुरुंगात पाठविले 

पोलिस तपास करत असताना  गुन्ह्यात बापू नायर याचा सहभाग असल्याचे समोर आले.

ससून रुग्णालयात मारटकर यांचा खून करणारे आरोपी बापू नायरला भेटण्यास गेल्याचे समोर आले होते.

Advertisement

त्यानुसार पोलिसांनी प्रथम बापू नायर टोळीचा सदस्य स्वप्नील मोडवे याला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकातील अमोल पवार व अजय थोरात यांनी सातारा येथून अटक केले होते.

दरम्यान, बापू नायरवर कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल असणाऱ्या एका गुन्ह्यात मोक्कानुसार कारवाई केली गेली आहे .

बापू नायर सध्या येरवडा कारागृहात आहे.

मात्र दीपक मारटकर यांच्या खुणापूर्वी तो दोन ते तीन दिवस आजारी असल्याने ससून रुग्णालयात उपचारासाठी आला होता.

Advertisement

यादरम्यान यातील आरोपी त्याला भेटले असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले होते.

वाचा : युवा सेनेचे दीपक मारटकर खून प्रकरणी 6 पोलीस निलंबित

यानुसार पोलिसांनी या गुन्ह्यात 12 जणांवर मोक्कानुसार कारवाई केली आहे. त्यात नायर ला आज अटक करण्यात आली आहे.

त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर त्यास सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली .

Advertisement

दीपक मारटकर  खून वर्चस्व वादातून झाला असल्याचे दिसून आले होते.

दीपक मारटकर यांचा खून नेमका कोणत्या कारणांनी झाला तसेच या मागे आणखी काही व्यक्ती किंवा इतर कारण आहे का याचा तपास चालू आहे.

One thought on “दीपक मारटकर खून प्रकरणात गुंड बापू नायर ला अटक

Comments are closed.

%d bloggers like this: