बराटेला मदत करणाऱ्या त्या तिघांना जामिन
Ravindra Barate issue : आरोपींना मदत करणाऱ्या त्या तिघांची पोलीस कस्टडी रद्द करून कोर्टाने जामीन मंजूर केले

Ravindra Barate issue : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : पुणे ; रविंद्र बराटेला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी तिघांना देण्यात आलेली पोलिस कोठडी सत्र न्यायालयाने शनिवारी रद्द केली .
सत्र न्यायाधीश जी. पी. अग्रवाल यांनी हा आदेश दिला. विशाल शिवाजी ढोरे (३६), अस्लम मंजूर पठाण (२४, दोघेही रा. मांजरी, हडपसर)
आणि सिद्धार्थ महिंद्र डांगी (२८, रा. उत्कर्ष सोसायटी, कात्रज) असे पोलिस कोठडी रद्द करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
मी दादांचा पी.ए बोलतोय म्हणत २५ लाखांची मागणी,
बांधकाम व्यावसायिकाला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन जागा आणि तब्बल दोन कोटींच्या खंडणीची मागणी करून ,
दीड लाख रूपयांची खंडणी उकळल्या प्रकरणात बराटे,दीप्ती आहेर,
बडतर्फ पोलिस शैलेश जगताप आणि अमोल चव्हाण यांच्यावर कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
LOCKDOWN च्या काळात cyber crime मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ
या गुन्ह्यात बराटे फरार असून त्याला पळून जाण्यास ढोरे, पठाण आणि डांगी यांनी मदत केली असे पोलिसांचे म्हणणे आहे.
याप्रकरणी प्रथमवर्ग न्यायालयाने त्यांना २९ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती.याविरोधात तिघांच्या वतीने ऍड. दादासाहेब भोईटे,
ऍड. शरद भोईटे आणि ऍड. रोहिणी लंघे यांनी सत्र न्यायालयात फौजदारी पुनर्विचार याचिका दाखल केली होती.
ढोरे, पठाण आणि डांगी यांचा खंडणीच्या गुन्ह्याशी संबंध नाही. त्यांनी केवळ रविंद्र बराटे याला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
हा गुन्हा जामिनास पात्र आहे. त्यामुळे त्यांना अटक करून कोठडीत घेणे बेकादेशीर आहे, असा युक्तिवाद बचाव पक्षाकडून करण्यात आला.
त्यामुळे सत्र न्यायालयाने आरोपींची पोलिस कोठडी रद्द करण्याचे आदेश दिले. त्यानंतर प्रथमवर्ग न्यायालयाने तिघांना जामिन मंजूर केला.
कोरोना रुग्णांसाठी बेड मिळत नसल्याने भीम आर्मीचे बेड आंदोलन
Pingback: (Bank ATM) बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारा गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात