उधारीवर सिगारेट दिली नसल्याने एकावर जिव घेणा हल्ला,

ebook.trendingstudysajagnagrikktimes.sajag-advertisement-offer
Advertisement

हम सय्यदनगर के “भाई” है काट डालूंगा असे म्हणत लोखंडी कोयत्याने केला हल्ला.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : छोट्या छोट्या भाईंची हिम्मत-दादागिरी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. किरकोळ कारणावरून पार जीव घेण्या पर्यंत मजल गेली आहे.

हडपसर सय्यदनगर मधील छटाक भाईंची भाईगिरी मुळे स्थानिक नागरिकांना डोकेदुखी वाढली आहे. एकाने उधारीवर सिगारेट न दिल्याने पार त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे.

सदरील घटनेची फिर्याद अरिफ सैय्यद,वय- ३३ वर्षे,रा.लेन नं.३ चिंतामणीनगर,हांडेवाडी रोड यांनी वानवडी पोलीस ठाण्यात दिल्याने दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हकीकत अशी की १७ मे रोजी ओम क्लिनीक जवळ हांडेवारी रोड येथे फिर्यादी सय्यद यांचे वडीलांची पानटपरीवर लोखंडी बॉक्सवर दगड मारुन, शिवीगाळ करुन आरोपींनी सिगरेटचे पॉकेटची मागणी केली.

परंतु लॉकडाऊन असल्याने व पानटपरी बंद असुन सिगारेटचे पॉकीट नसल्याचे सांगीतल्याचे कारणावरून त्यांनी चिडून ‘साले बुढे हमको सिगरेट नही देता क्या हम कोन है तुझे मालुम नही क्या,

सिगरेट नही दिया तो मैं तुझे मार डालुंगा’ असे म्हणुन सय्यद यांचे वडीलांचे अंगावर धावुन जावुन त्यांना धक्का-बुक्की करून जीवे मारण्याचे उद्देशाने त्यांचा गळा दाबल्याने ते बेशुदध पडले.

त्यांना आरिफ सय्यद यांनी उपचारासाठी हॉस्पीटल मध्ये घेवुन गेले होते.

आरिफ सय्यद हे बाहेर रोडवर थांबले असताना पुन्हा आरोपी यांनी त्यांचेजवळ येवुन लोखंडी कोयता काढुन ‘साले ज्यादा हिरोगीरी मत दिखा मेरे आगेपीछे तो कोई नही है तेरे पिछे पुरा परिवार है,चल मुझे अब सिगरेट दे,तुझे हररोज हमे फ्रि में सिगरेट देना पडेगा,

सिगरेट नही तो काट डालुंगा’ अशी धमकी देवुन,त्यांचे हातातील कोयता हवेत फिरवुन,हातात दगड घेवुन ‘हम सैय्यदनगर के भाई है,कोई हमारे नाद को लगा,तो हम उसको काट डालेंगे’ असे म्हणुन परिसरात दहशत निर्माण केली.

तसेच तेवढ्यावरच न थांबता लोकांवर दहशत राहावी यासाठी आरिफ सय्यद यांच्या घरावर पेट्रोल टाकुन घर पेटविले आहे.

यामुळे सय्यद नगर भागात काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता. पुढील तपास वानवडी पोलीस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक संदिप वरपडे करीत आहेत.

Advertisement
Share Now

2 thoughts on “उधारीवर सिगारेट दिली नसल्याने एकावर जिव घेणा हल्ला,

Comments are closed.