कोर्ट केसचे काय झाले विचारत आरोपीने-फिर्यादीवर तलवारीने केला प्राणघातक हल्ला,

खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : कोर्ट केसचे काय झाले असे आरोपीने फिर्यादीला विचारता फिर्यादी पुढे जात असताना त्याला पाठिमागून तलवारी हल्ला केल्याप्रकरणी खडक पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Digital visiting cardcreat a new website 4999 ₹creat a new website 9999 ₹

हकीकत अशी की खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोहियानगर भागात साहील बागवान,वय-२१ वर्षे, रा.लोहीयानगर हे बाबु मामडी चौका जवळ लोहीयानगर येथे सार्वजनिक रोडवर उभे असताना,

करण कालीदास साळवे,वय-२२ वर्षे,रा.लोहीयानगर हा बागवान यांच्या जवळ येऊन सन २०१६ मध्ये भांडणे झाली होती.

त्या बाबतीत खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असुन केस कोर्टात चालु आहे.आरोपी याने फिर्यादी जवळ येवुन सन २०१६ चे केसचे काय झाले ? केस कधी बोर्डावर येणार आहे?

Advertisement

याबाबत विचारणा केली. त्यावेळी फिर्यादी बागवान यांनी अजुन मला कोर्टाचे समज आले नाही असे सांगीतलेचे कारणावरून आरोपीने फिर्यादीस तुझी आज विकेटच पाडतो अशी धमकी देवुन त्यांना शिवीगाळ केली.

त्यानंतर फिर्यादी हे तेथुन त्यांचे घरी जात असताना आरोपीने त्यांचे पाठीमागुन येवुन त्याच्या हातातील तलवारीने बागवान यांचे

डोक्यात तसेच उजवे हातावर वार करुन त्यांना गंभीर जखमी करुन,जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश माने करत आहेत.

Advertisement
%d bloggers like this: