मौजमजेसाठी वाहने चोरून पेट्रोल संपल्यानंतर वाहने सोडून देण्या-या सराईत चोरटयास अटक,

ebook.trendingstudysajagnagrikktimes.sajag-advertisement-offer
Advertisement

एकूण ५ लाख रुपयांच्या ८ स्प्लेंडर मोटर सायकल, १ युनिकॉन व ॲक्टिवा दुचाकी जप्त.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : मौजमजेसाठी वाहने चोरून पेट्रोल संपल्यानंतर वाहने सोडून देण्या-या सराईत चोरटयास,

चतुःश्रृंगी पोलीसांनी अटक करून त्याचेकडून एकूण १० चोरीच्या मोटर सायकल हस्तगत करून गुन्हे उघडकीस आणले आहे.

चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मागील काही महिण्यांपासुन मोटार वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती.

त्यामुळे पंकज देशमुख पोलीस उपआयुक्त यांनी आढावा घेवून वाहन चोरीच्या गुन्हयांना प्रतिबंध करण्याकरीता व दाखल गुन्हे,

उघडकीस आणणे करीता चतुःश्रृंगी पोलीस ठाण्या अंतर्गत पथक तयार केला होते. गुन्हे प्रतिबंधात्क पेट्रोलिंग करीत असताना,

पथकामधील पोलीस नाईक प्रकाश आव्हाड व सारस साळवी यांना मिळालेल्या बातमीवरून अमीनुर वहाब मंडल, वय २७ वर्षे,

रा.सध्या कपिल मल्हार सोसायटी जवळ, शिंदे पारखे मळा, बाणेर पुणे. मुळ-कासीपुर, पो.कुमडा, थाना-हाबडा, जि.२६ परगना,

राज्य- पश्चिम बंगाल याचेकडे चोरीचे वाहन असून तो धनकुडे वस्ती, बाणेर येथे आलेला आहे. त्याप्रमाणे पथकाच्या सहायाने सापळा रचुन आरोपीस ताब्यात घेण्यात आले‌.

अनिल शेवाळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक,दादा गायकवाड पोलीस निरीक्षक गुन्हे यांचे सुचनांप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव,महेश भोसले व दिनेश गडांकुश, मुकूंद तारू,

पोना श्रीकांत वाघवले,आव्हाड, सारस साळवी, प्रमोद शिंदे, संतोष जाधव, ज्ञानेश्वर मुळे, आशिष निमसे,अमोल जगताप,

वसिम सिद्दीकी व तेजस चोपडे यांनी तपास केला असता अटक आरोपी याने चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याकडील एकूण ८ वाहने,

विश्रामबाग व अलंकार पोलीस ठाण्याकडील प्रत्येकी १ वाहन असे १० वाहने त्याच्याकडून जप्त करण्यात आल्या आहेत. एकूण ५,

लाख रुपयांच्या ८ स्प्लेंडर मोटर सायकल, १ युनिकॉन व एक ॲक्टिवा हस्तगत करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव हे करीत आहेत.

Advertisement
Share Now