आज ॲन्टी करप्शनची तीन ठिकाणी कारवाई,

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement

(Anti corruption red) पुणे जिल्ह्यात उडाली खळबळ.

(Anti corruption red) पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे ;

creat a new website 9999 ₹Digital visiting cardcreat a new website 4999 ₹

लॉकडाउनच्या काळातही लाचखोरी थांबायला तयार नाही.

आज ॲन्टी करप्शन विभागाने तीन ठिकाणी कारवाई केल्याने पुणे जिल्ह्यात मोठ्ठी खळबळ उडाली आहे.

शिरूर, तळेगाव दाभाडे व पुण्यातील एका वकिलाचा देखील त्यामध्ये सहभाग आहे.

Advertisement

पिंपरी चिंचवडमधील तळेगाव दाभाडे येथील पालिकेचे सीओ(CO) शाम शेट्टी आणि आणखी एका अधिकाऱ्याने ९ लाख रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले आहे.

तक्रारीत लाच मागितली असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ॲन्टी करप्शन विभागाने गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली आहे.

anti-corruption-action-red-in-three-places-today

वाचा : पुणे महानगरपालिकेच्या महिला ॲडव्हायझरवर अँटी करप्शनची कारवाई,

त्यांना पकडले असल्याची माहिती मिळाली आहे.

Advertisement

तर शिरुर येथील शिवाजी महादु गव्हाणे यांना पकडले आहे.

शिवाजी गव्हाणे हे शिरूरमधील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात सहकार अधिकारी आहेत.

यातील तक्रारदार यांनी त्यांचा सावकारी परवाना नुतणीकरणासाठी अर्ज केला होता. त्यावेळी गव्हाणे यांनी २० हजार रुपयांची मागणी केली होती.

याबाबत तक्रारदार यांनी अँटी करप्शनकडे तक्रार केली होती. त्यानुसार आज तडजोडीनंतर १५ हजार रुपये घेताना पकडले आहे.

Advertisement

तर तिसऱ्या कारवाईत एका वकिलाला १० हजार रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यामध्ये महिला तक्रारदाराने तक्रार केली होती.

महिलेच्या केसमध्ये शासनाने वकील म्हणून संबंधिताला नेमले आहे.

यावेळी त्यांनी २० हजार रुपयांची लाच तक्रारदार महिलेकडे मागितली होती.

याबाबत त्यांनी अँटी करप्शन विभागाकडे तक्रार दाखल केली होती.

Advertisement

त्यात पडताळणी करण्यात आली. लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार आज १०हजार रुपये घेताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.

वाचा : अखेर इनामदाराच्या शाळेने भरले लाखो रुपये प्रॉपर्टी टॅक्स.

Advertisement
Advertisement
Share Now