पुणे महानगरपालिकेच्या महिला ॲडव्हायझरवर अँटी करप्शनची कारवाई,

ebook.trendingstudysajagnagrikktimes.sajag-advertisement-offer
Advertisement

(Anti corruption action) पुणे महानगरपालिकेत उडाली खळबळ.

(Anti corruption action) पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे :

पुणे महानगर पालिकेत विधि विभागातील महिला ॲडव्हायझरवर अँटी करप्शन विभागाने कारवाई केल्याने पुणे महानगर पालिकेत खळबळ उडाली आहे.

सदरील महिलेला ५० हजार रुपये लाच घेताना पकडण्यात आले आहे.

मंजुषा इधाटे असे पकडण्यात आलेल्या महिला अधिकाऱ्यांचे नाव‌ आहे.

anti-corruption-action-against-pune-municipal-corporations-female-advisor/

वाचा : पुण्यातील ३ पोलीस निरीक्षकांना पोलीस आयुक्तांचा दणका,

याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

मंजुषा इधाटे या पुणे महापालिकेत टेक्निकल ॲडव्हायझरवर म्हणून नोकरीस आहेत.

यातील तक्रारदार हे बांधकाम व्यावसायिक आहेत.त्यांचे पालिकेत टीडीआर प्रकरणं सुरू आहेत.

ते प्रकरण महिला अधिकारी इधाटे यांच्याकडे होते.

त्यावेळी त्यांनी तक्रारदार यांच्याकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली होती.

याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ANTI CORRUPTION BUREAU PUNE ) तक्रार केली होती.

त्याची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने आज सापळा रचून कारवाईत इधाटे यांना ५० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्योती पाटील करीत आहे.

इधाटे ह्या महापालिकेतून ३० जून रोजी महिला अधिकारी सेवानिवृत्त होणार होत्या.

अश्यातच कारवाई झाल्याने पालिकेत उलटसुलट चर्चा ऐकायला मिळत आहे.

वाचा : अखेर इनामदाराच्या शाळेने भरले लाखो रुपये प्रॉपर्टी टॅक्स.

Advertisement
Share Now