विज मिटर कट करायला गेलेल्या कर्मचाऱ्यांसमोर धिंगाणा घालणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल,

ebook.trendingstudysajagnagrikktimes.sajag-advertisement-offer
Advertisement

creat a new website 4999 ₹Digital visiting cardcreat a new website 9999 ₹

वानवडी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : पुणे हडपसर मंहमद वाडी रोड तरडे वस्ती येथे विज बिल थकीत असताना विज कनेक्शन कट करायला गेलेले महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जात शिवीगाळ केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अविनाश शत्रुघ्न भोसले, वय ४२ वर्षे रा.स.नं.३७, गल्ली नं.६, काळेपडळ, हडपसर यांनी फिर्याद दिली आहे.

भोसले यांच्याकडे विजग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करणे, ब्रोक डाऊन झाल्यास ती सुरळीत करणे तसेच थकीत व चालु विजबिलांची वसुली करणे अशी कामे असुन महंमदवाडी परीसरातील तरवडेवस्ती, कृष्णा नगर, हेवनपार्क, लक्ष्मीपार्क गणेश नगर,शेंडकर पार्क, भाग त्यांच्याकडे आहे.

Advertisement

सकाळी कामावर आल्यावर वरिष्ठांनी दिलेल्या सुचनेनुसार भोसले व त्यांचे साथिदार हे थकित विज बिलांवरील कारवाईसाठी स.नं.५९,आनंद नगर,तरवडेवस्ती, हडपसर पुणे येथे गेले असता तेथील थकबाकीदार विजग्राहक बारकु धाकु शिंदे यांचे १९ हजार रुपये

थकबाकी असलेने त्याचे घराचे जवळ गेले व तेथे थकबाकीदार विज ग्राहक यांची पत्नी जयश्री शिंदे हया दिसल्याने भोसले यांनी सांगितले की, तुम्हाला एक महीन्यापुर्वी थकीत विजबिल भरणे बाबत कळविले होते.

तसेच तुमचा आमचे कंपनीकडे प्राप्त मोबाईल नंबरवर सुध्दा एस. एम. एस. व्दारे विजबिल भरणे बाबत कळविण्यात आलेले होते. परंतु आपण विजबिल न भरलेन आम्ही तुमचे विजकनेक्शन तोडणार आहेत.

आपणास अजुन काही वेळ पाहीजे असल्यास सांगा ,आम्ही काही दिवस थांबु शकतो. तेवढ्यात तेथे त्यांचा मुलगा सचिन शिंदे हा आला वीज तोडायला आलो आहोत हे ऐकुन अंगावर धावून आला व शिवीगाळ केल्याप्रकरणी संबंधितांविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement
Share Now

One thought on “विज मिटर कट करायला गेलेल्या कर्मचाऱ्यांसमोर धिंगाणा घालणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल,

Comments are closed.