जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून कोंढव्यात तरुणावर जीव घेणा हल्ला,

ebook.trendingstudysajagnagrikktimes.sajag-advertisement-offer
Advertisement

५ जणांविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.(Kondhwa police station news)

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : पुर्वीच्या भांडणाचा राग मनात ठेवून मारहाण करण्याचे प्रमाण वाढले आहे. तर रोजच्या गुन्ह्यांमुळे पोलीसांचे देखील काम वाढले आहेत.

कोंढवा येथे काल एका तरुणावर ५ जणांच्या टोळक्याने जीव घेणा हल्ला केला आहे. त्या संदर्भात प्रल्हाद जाधव,वय १९ वर्षे,रा.येवलेवाडी यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांचा लहान भाऊ कार्तिक अनिल जाधव,वय-१७ वर्षे यांचेसोबत पुर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन त्याचे ओळखीच्या ४ ते ५

जणांनी त्यास जीवे ठार मारण्याचे उददेशाने,लोखंडी कोयत्याने कार्तिक जाधव याचे डोक्यावर हातावर, कानावर वार करुन,त्यास गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.

सदरील आरोपी फरार झाले असून कोंढवा पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक स्वराज पाटील करत आहेत.

Advertisement
Share Now