लाच घेताना आरटीओतील एजंट अँटी करप्शनच्या जाळ्यात,

ebook.trendingstudysajagnagrikktimes.sajag-advertisement-offer
Advertisement

१३०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : पिंपरी-चिंचवड आरटीओ मधील एजंटांचा सुळसुळाट असूनही अधिका-यांकडून‌ मात्र कारवाई होताना दिसत नाही.

आरटीओ मध्ये नागरिक कामानिमित्त आले की एंजट घोळक्याने विचारणा करत अंगावर येत असल्याचे उघड डोळ्याने पाहत असतो.

एंजट नियमा पेक्षा जास्त रक्कम मागून नागरिकांची लूट करत असनाही अधिकारी मुग गिळून गप्प आहेत. कारण आजही अधिकाऱ्यांच्या नावाने एंजट वसुली करत आहेत.

असाच प्रकार आज पिंपरी-चिंचवड आरटीओत घडला आहे. अधिकाऱ्यांना द्यायची रक्कम म्हणून नागरिकांकडून जास्त पैश्यांची मागणी,

करणा-या एंजटांला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १३०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.

दुचाकी ट्रान्सफर केल्यानंतर त्याची एनओसी (NOC) देण्यासाठी एका खासगी एजंटने वेगवेगळ्या टेबलवरील अधिका-यांना १३००,

रुपये लाच द्यावी लागते म्हणून तक्रारदाराकडून लाचेची रक्कम घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

अक्षय एम. माळवे वय २४रा. आकु्डी असे लाच घेणाऱ्या एजंटचे नाव आहे. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.

Advertisement
Share Now