पप्पु येणपुरे गँग विरुध्द मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई,

ebook.trendingstudysajagnagrikktimes.sajag-advertisement-offer
Advertisement

आतापर्यंत मोक्का अंतर्गातील ४९ वी कारवाई. ( Action under Mocca Act against Pappu Yenpure Gang)

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : प्रविण उर्फ पप्पू अनंता येणपुरे यांच्या गॅंगवर पुणे पोलिसांनी मोकका कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे.
येणपुरे याने प्रत्येक गुन्हयाचे वेळी सोबत वेगवेगळे साथीदार घेवुन आपल्या टोळीची दहशत व वर्चस्व राखण्याकरीता तसेच स्वतःचे व टोळीचे अवैध आर्थिक फायद्याकरीता दरोड्याची तयारी, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्र, दहशत माजविणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केलेले आहेत.

तसेच १ ऑगस्ट रोजी पप्पु येणपुरे व त्याचे साथिदारांनी कोयत्याचा धाक दाखवुन मारहाण करुन लुबाडले व परिसरात घातक हत्याराच्या साह्याने दहशत पसरविली म्हणुन निखिल गायकवाड रा. सच्चाईमाता, आंबेगाव खुर्द, पुणे यांनी फिर्याद भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात ( Bharati Vidyapeeth police station) फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(१) प्रविण उर्फ पप्पू अनंता येणपुरे वय २७ वर्षे रा.अटल चाळ नं. १०, घर नं ४३, सर्वे नं. ४३, सचाईमाता, आंबेगाव खुर्द, व त्याचे साथिदार २) अजित अंकुश धनावडे वय २४ वर्षे रा. अटल १०, रुम नं. ०१, मेहरा किराणा सुपर मार्केट, सच्चाईमाता नगर, आंबेगाव खुर्द, ३) अभिजीत नंदु बोराटे, वय ३१ वर्षे, रा. स.नं. ५७, वाघजाई मंदिरामागे, आंबेगाव खुर्द, कात्रज यांना अटक करण्यात आली आहे.

पप्पु येणपुरे टोळीवर यापुर्वी सन २०१६ पासुन गंभीर गुन्हे दाखल आहेत.गुन्हेगारी कृत्यांपासुन परावृत्त करण्याच्या उद्देशाने त्याचेवर यापुर्वी प्रतिबंधक कारवाई तसेच हद्दपारी सारखी ठोस कारवाई करुन देखील त्यांचे गुन्हेगारी वर्तनात काही एक चांगला परिणाम झालेला नसल्याने त्यांचेवर ठोस व कडक कारवाई करणे आवश्यक असल्याने त्यासाठी पुढील कार्यवाही करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता ( pune police commissioner amitabh gupta ) यांनी शहरातील पोलीसांना दिलेल्या आदेशानुसार सक्रिय गुन्हेगारी टोळीवर भारती विद्यापीठ पोलीस ठाणे येथे दाखल असणारे गुन्ह्यास मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई होणे करिता संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे यांना सागर पाटील पोलीस उपआयुक्त परिमंडळ-०२ यांचे मार्फतीने प्रस्ताव सादर केला होता.

तो प्रस्ताव १९ ऑगस्ट रोजी मंजुर करण्यात आला आहे. पुढील तपास सुषमा चव्हाण सहाय्यक आयुक्त स्वारगेट हे करीत आहे.सदरचा मोक्का प्रस्ताव जगन्नाथ कळसकर भारती विद्यापीठ पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली संगिता यादव पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणीक, पोलीस निरीक्षक (गुन्हे), आशिष कवठेकर, वैभव गायकवाड कृष्णा बढे, महेश बारवकर, निलेश ढमढेरे व अमित शेडगे यांनी
सादर केला आहे.

Advertisement
Share Now