पुण्यातील ३ पोलीस निरीक्षकांना पोलीस आयुक्तांचा दणका,

ebook.trendingstudysajagnagrikktimes.sajag-advertisement-offer
Advertisement

(Three police inspectors in Pune) क्रांतीकुमार पाटील,अशोक कदम,अजित लकडे अशी शिक्षा सुनावलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची नावेआहेत.

(Three police inspectors in Pune) पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे :

पुण्यातील ३ पोलीस निरीक्षकांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कारवाईचा बडगा उगारलयाने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

गुन्हेगारांची गय केली जाणार नाही असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून ३ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना शिक्षा केली आहे.

दोन पोलीस निरीक्षकांना अवैध धंद्यांबाबत आणि एका पोलीस निरीक्षकाला तपास व्यवस्थित न केल्याबद्दल शिक्षा देण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली .

वाचा : पुणे महानगरपालिकेच्या महिला ॲडव्हायझरवर अँटी करप्शनची कारवाई,

क्रांतीकुमार पाटील, अशोक कदम, अजित लकडे अशी शिक्षा सुनावलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची नावे आहेत.

लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या चालणा-या धंद्यावर दुर्लक्ष केल्या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्यावर एक वर्षाची पगारवाढ रोखची कारवाई करण्यात आली आहे.

तर वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (MCOCA) दाखल गुन्ह्याचा तपास आणि दोषारोपपत्र दाखल करताना निष्काळजीपणा केल्याचे आढळून आले.

वानवडी मध्ये डिसेंबर 2020 ला बेटींगप्रकरणी छापा टाकण्यात आला होता. त्यानुसार पाच जणांविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

संबंधित गुन्ह्यातील आरोपी मनीष अजवानी याच्या मोबाईल क्रमांकाचा सीडीआर काढला असता

वानवडीचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील हे छापा टाकण्यापूर्वी आरोपीसोबत बोलल्याचे निष्पन्न झाले.

वाचा : आंबिल ओढय़ात ठेकेदाराच्या चुकीमुळे घरांना गेले तडे;

क्रांतीकुमार पाटील चे 13 वेळा फोनवर बोलणे झाल्याचे सीडीआरमध्ये दिसून आले.

त्यामुळे पाटील यांनी केलेले वर्तन बेजबाबदार पणाचे असून पोलिस दलाच्या शिस्तीस बाधा आणणारे कृत्य केल्याचा ठपका ठेवत पाटील यांची एक वर्षे पगारवाढ रोखण्याची शिक्षा देण्यात आली आहे.

त्यामुळे त्यांची चौकशी करुन पोलिस आयुक्तांनी कारवाई केली आहे.

Advertisement
Share Now

2 thoughts on “पुण्यातील ३ पोलीस निरीक्षकांना पोलीस आयुक्तांचा दणका,

Comments are closed.