पुणे शहरात अवैध गुटखा विक्री करणाऱ्या ३१ ठिकाणी छापे,

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement

४७ लाख ९६ हजार २०८ रुपयांचा गुटखा जप्त.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : पुणे शहर पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार आज पुण्यातील विविध ठिकाणी छापे टाकून,

अवैध गुटखा विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

कर्मचाऱ्यांचे पथके स्थापन करुन पुणे शहरातील वेगवेगळ्या भागात आज रोजी अवैध गुटखा धंद्यावर कारवाई करण्यात आली आहे.

कोंढवा पोलीस ठाण्यात २, हडपसर पोलीस ठाण्यात ६, मुंढवा १, चंदननगर १, येरवडा १, सिंहगड रोड १ असे एकुण १२ गुन्हे दाखल करुन,

त्यामध्ये २२ लाख २७ हजार ९५० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

तर स्वारगेट, भारती विद्यापीठ, चंदननगर, चतुश्रृंगी कोथरुड, समर्थ, हडपसर या पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापे टाकुन एकुण १९ गुन्हे दाखल करुन,

२५ लाख ६८ हजार २५८ रुपयांचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला.

असे ३१ गुन्हे दाखल करण्यात आले असून एकुण ४२ जणांवर कारवाई करण्यात आली असून एकूण ४७ लाख ९६ हजार
२०८ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आलेला आहे.

Advertisement
Share Now