बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनीचे बनावट इन्शुरन्स पॉलिसी पेपर तयार करणाऱ्या आरोपीस जेरबंद,

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement

लॅपटॉप, प्रिंन्टर, शिक्के, स्टॅम्प पॅड, व कोरी कागदे ३२ हजार ५०० रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनीचे बनावट इन्शुरन्स पॉलिसी पेपर तयार करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी जेरबंद केले.

बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लि. पुणे यांचे नावाचा लोगो व शिक्क्याचा वापर करुन, बनावट इन्शुरन्स पॉलिसी पेपर तयार करुन एक इसम येरवडा व लोहगांव भागात ते बनावट पॉलिसीचे पेपर पियाजो,

बजाज ऑटो रिक्षा, टुरीस्ट कार, टेम्पो व ट्रक अशा वाहनांचे मालकांना कमी पैशात, बनावट इन्शुरन्स तयार करुन आर.टी.ओ. पासिंगसाठी देत आहे व तशी एक बनावट इन्शुरन्सी पॉलिसीची प्रत प्राप्त झाल्याने सदर बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लि. पुणे या कंपनीची

फसवणुक होत असल्याची खात्री पोलिसांना झाल्याने सदर कंपनीचे अधिकारी यांना संपर्क साधुन त्यांना वरील प्राप्त बनावट इन्शुुरन्स पॉलिसीची प्रत दाखवली ती बनावट असल्याची खातरजमा करुन त्याबाबत वरिष्ठ अधिकारी यांना माहिती देवुन कारवाईच्या सुचना प्राप्त झाल्याने.पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पाडवी,

पोलीस उप निरीक्षक गुंगा जगताप यांना येरवडा, पुणे येथे एक इसम सदर बनावट इन्शुरन्स पॉलिसी पेपर्स घेवुन दुचाकी वरुन जाणार असल्याची बातमीदारा मार्फत बातमी समजल्याने पोलीस अधिकारी व बजाज इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी यांचेसह सदर बातमीचे ठिकाणी दुचाकी स्वारास पकडले असता त्याचे नाव संतोष विठ्ठल शिंदे, वय ४७ वर्षे, रा.

स.नं.१०३, बुध्दविहार जवळ, गांधीनगर येरवडा पुणे व पवार वस्ती, लोहगांव, पुणे असे त्याने सांगितल्याने त्याचे कब्जात व त्याचे जवळील दुचाकी गाडीचे डिक्कीत असे एकुण ३४ बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स पॉलिसीचे एकुण ६ लाख ३२ हजार ९४२ रुपयांचे बनावट पेपर मिळुन आल्याने बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनीचे संबंधीत अधिकारी यांची फिर्याद घेवुन शिंदे विरुध्द येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडीची रिमांड घेण्यात आली असता, त्या दरम्यान सदर आरोपीचे राहते घराची पंचा समक्ष घरझडती घेता त्याचे घरामध्ये सदर बनावट इन्शुरन्स पॉलिसी पेपर तयार करण्याकरीता वापरात येणारे लॅपटॉप, प्रिंन्टर, शिक्के, स्टॅम्प पॅड, व कोरी कागदे ३२ हजार ५०० रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

शिंदे याने या कामाकरीता कोणाची मदत घेतलेली आहे. त्याबाबत तपास चालु आहे. तसेच त्याने यापुर्वी किती लोकांना अशापध्दतीचे बनावट इन्शुरन्स पेपर वाटप केलेले आहे याबाबत तपास चालु आहे.

Advertisement
Share Now