कोंढव्यातील खून प्रकरणातील आरोपींना अटक,

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement

कार्तिक अनिल जाधव याच्यावर झाला होता खूनी हल्ला.( Kondhwa murder case)

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून १२ ऑगस्ट रोजी दुपारी ४ : ३० च्या वेळी स्टॉर हॉटेल सॅन्क्स सेंटरचे समोरील कट्यावर जनता गॅरेज येवलेवाडी रोड येथे कार्तिक अनिल जाधव (Karthik Anil Jadhav ) याच्यावर जीव घेणा हल्ला करून डोक्यावर, हातावर, कानावर कोयत्याने वार करुन त्याला गंभीर जख्मी करण्यात आले होते.

त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आले असता त्याचा मृत्यू झाला आहे. खून प्रकरणातील मुख्य आरोपी अभिषेक पवार व त्याचे साथीदार फरार झालेले होते. सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी अभिषेक पवार व त्याचे साथीदारांचा तपास सुरू असताना खंडणी विरोधी पथकातील अंमलदार पोलीस हवालदार सुरेंद्र जगदाळे यांना बातमी मिळाली की,

कार्तिक याच्या खूनातील आरोपी अभिषेक पवार व त्याचे साथीदार हे वाघोली चौकात येणार असल्याने वरीष्ठांचे मार्गदर्शनाने सदर ठिकाणी सापळा रचण्यात आला होता. त्यात १) अभिषेक दशरथ पवार वय १९ वर्षे, धंदा स्लायडींग,रा. भैरवनाथ मंदीराच्या मागे, शिवनेरी नगर कोंढवा बु. पुणे, २) अजय नरसिंग गरड वय १९ वर्षे, रा. पाटील वस्ती फोडजाई माता नगर, येवलेवाडी, कोंढवा पुणे, व विधी संघर्षित बालक यास ताब्यात घेवुन त्यांना कोंढवा पोलीस ठाण्याकडे सुपुर्द करण्यात आले आहे.

अपर पोलीस आयुक्त,गुन्हे अशोक मोराळे पोलीस उपआयुक्त गुन्हे,श्रीनिवास घाडगे, सहा. पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड, श्रीकांत चव्हाण, पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे,

शैलेश सुर्वे,सचिन अहिवळे, प्रदिप शितोळे, राहुल उत्तरकर, विनोद साळुके, संग्राम शिनगारे, महेश साळुके, प्रविण पडवळ, विजय गुरव, संपत औचरे, अमोल पिलाने, चेतन शिरोळकर, मोहन येलपल्ले, महीला पोलीस आशा कोळेकर, रुपाली कर्णवर, यांनी कामगिरी केली आहे.

Advertisement
Share Now