१४ वर्षा पासुन फरारी असलेला आरोपी अटक
Accused arrested : या आरोपीवर बतावणी करुन फसवणुक करणे व चोरीचे १२ गुन्हे दाखल आहेत

Accused arrested : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : पुणे : चोरीच्या गुन्ह्यात १४ वर्षा पासुन फरारी असलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यास पोलीसांना यश.
गुन्हे शाखा, युनिट-२ पुणे शहर कडील पोलीस हवालदार यशवंत खंदारे व पोलीस शिपाई कादीर शेख
हे युनिट-२ च्या हद्दीतील एम.ओ. बी. शाखेकडील यादीतील पाहीजे असलेल्या आरोपीचा शोध घेत होते,
कादीर शेख यांना त्यांच्या बातमीदारा मार्फम माहीती मिळाली की,
हडपसर पोलीस ठाणे येथील चोरीचा गुन्हा दाखल असलेला फरार आरोपी मोहीद्दीन उर्फ मोहिशिन शब्बीर ईराणी (रा. शिवकृपा झोपडपट्टी शिवाजीनगर पुणे.) येथील रोडवर थांबला आहे.
पुण्यातुन तडीपार असताना ही पुण्यात येवुन दहशत माजवणारा सराईत जेरबंद
तेथे जावुन गुप्तपणे पहाणी केली असता मिळालेल्या माहीती मधील इसम रोडच्या कडेला थांबलेला दिसला.
त्यास त्यानी ताब्यात घेवुन त्याच्याकडे वरील दाखल गुन्हयाबाबत विचारले असता त्याने त्याचा साथीदार शेरखान ऊर्फ गुलमिर्झा ईराणी याचेसह गुन्हा केल्याचे कबुल केले ,
त्यास आज ताब्यात घेवुन युनिट-२ कार्यालयात आणून पुढील योग्य त्या कारवाईसाठी हडपसर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
आरोपी हा पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार असुन त्याच्यावर या पुर्वी बतावणी करुन फसवणुक करणे व चोरीचे १२ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे,पोलीस उप आयुक्त बच्चन सिंह, सहा. पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप युनिट-२ गुन्हे शाखा पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली युनिट-२ कडील यशवंत खंदारे व कादीर शेख यांनी केली आहे.
श्रीराम चौक परिसरात रस्त्यावर खड्डे की खड्डयात रस्ते
Pingback: (Rickshaw driver's honesty )रिक्षात सापडलेले ८०,००० रुपये केले परत