२२ वर्षापासून पोलीसांना गुंगारा देणारा आरोपी अखेर जेरबंद,

ebook.trendingstudysajagnagrikktimes.sajag-advertisement-offer
Advertisement

बनावट कागदपत्र देवुन १३ लाख ५५ हजार घेवुन फसवणुक करत फरार झाला होता.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : फसवणुकीच्या गुन्ह्यातील २२ वर्षापासून पोलीसांना गुंगारा देत फरारी असलेला आरोपी संदिप सुधाकर धायगुडे याच्या युनिट ४ गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहे.

Digital visiting cardcreat a new website 9999 ₹creat a new website 4999 ₹

अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी एमओबीकडील पाहिजे फरारी आरोपींचा शोध घेवून कारवाई करणेबाबत आदेशित केले होते.चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात दाखल असून, सदर गुन्हयातील,

आरोपी संदिप सुधाकर धायगुडे, वय-५३ रा.१२९९ सदाशिव पेठ पुणे याने त्याचे सहकारी आनंद प्रभाकर गोरे रा.७२०/१७,

विजय बंगला नवी पेठ पुणे सध्या राहणार अमेरीका व सुब्रतो दास रा.बी/६/ ७ सत्यदर्शन मालवा रोड अंधेरी पुर्व मुबई यांचेसह विद्या

Advertisement

सहकारी बँक सेनापती बापट रोड शाखा पुणे येथे बनावट कागदपत्र देवुन १३ लाख ५५ हजार ९३६ रुपये घेवुन फसवणुक केली होती.

गुन्हा केल्यापासून गेले २२ वर्षे धायगुडे पोलीसांना गुंगारा देत होता. स्वतःचे अस्तित्व लपवून ठिकाणे बदलुन रहात होता.

गुन्हे शाखाकडील पोलीस कर्मचारी सचिन ढवळे यांना गुन्हयातील पाहिजे आरोपी संदिप सुधाकर धायगुडे हा शिवतिर्थनगर, कोथरुड भागात भाडयाने रहात असल्याची खात्रीशिर माहिती मिळाली होती.

त्याप्रमाणे वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेकडील पोलीस उप निरीक्षक शशीकांत शिंदे,पोलीस अंमलदार रुपेश वाघमारे, सचिन ढवळे, दत्तात्रय फुलसुंदर असे शिवतिर्थनगर, कोथरुड,

Advertisement

पुणे येथे सापळा रचून संदिप सुधाकर धायगुडे याला ताब्यात घेतले व चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

सदरची कारवाई ही अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उप-आयुक्त बच्चन सिंह, सहा.पोलीस आयुक्त गुन्हे-२,लक्ष्मण बोराटे, पोलीस निरीक्षक रजनिश निर्मल,

पोलीस उपनिरीक्षक, शशीकांत शिंदे, पोलीस उप-निरीक्षक, दिपक माने, पोलीस कर्मचारी सचिन ढवळे, रुपेश वाघमारे, दत्तात्रय फुलसंदर यांनी केली आहे.

Advertisement
Advertisement
Share Now

One thought on “२२ वर्षापासून पोलीसांना गुंगारा देणारा आरोपी अखेर जेरबंद,

Comments are closed.