३ हजारांची लाच घेणाऱ्या लिपीकाला एसीबी पकडले,

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement

जमिनीची मोजणी करून जागेची हद्द कायम करुन देण्यासाठी मागितली लाच.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : उपअधीक्षक मोजणी भूमी कार्यालयातील नगर भूमापन लिपिकासहित आणि एका खासगी इसमाला ३ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

creat a new website 4999 ₹creat a new website 9999 ₹Digital visiting card

या कारवाईमुळे भूमी अभिलेख कार्यालयात खळबळ उडाली आहे. पुरंदर अभिलेख नगर भूमापन लिपिक प्रमोद गणेश तुपे वय-३२ आणि खासगी इसम नवनाथ पांडुरंग मेमाणे वय-30 असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्यांचे नावे आहेत.

तक्रारदार यांच्या जमिनीची मोजणी झाली असून जागेची हद्द कायम करुन देण्यासाठी तुपे आणि मेमाणे यांनी तक्रारदार यांच्याकडे १० हजार रुपयांची लाच मागितली होती.

तडजोडीमध्ये ३ हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

Advertisement

लाचलुचपत अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष पडताळणी केली असता तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार आज सापळा रचून लिपिक तुपे आणि खासगी इसम नवनाथ मेमामे यांनी लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.

त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement
Share Now