पुणे महानगर पालिकेने जप्त केलेल्या गाड्या सोडण्यासाठी लाच घेणाऱ्या २ महाभागांना एसीबीने पकडले,
भाजीपाल्यांकडून करत होते हप्ते वसूली?
ठेकेदार पध्दतीने काम करत असल्याचे आले समोर.
पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : अतिक्रमण विभागाने उचललेल्या वाहनांची व इतर मालाची सोडवणूक करण्यासाठी नागरिकांकडून,
पैसे वसूली करणा-या पुणे महानगर पालिकेच्या दोन महाभागांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पैसे घेताना रंगेहाथ पकडण्यात,
आल्याने खळबळ उडाली आहे.विलास शिवाजी अभंगे आणि ऋतिक वाळके अशी पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही ठेकेदार पध्दतीने काम करणारे खासगी इसम आहेत.
दरम्यान पालिका विभाग अतिक्रमण कारवाई करते. फुटपाथवर लावल्यानंतर त्या गाड्यावर कारवाई केली करतात.
अशीच कारवाई येरवडा परिसरात केली होती. यावेवेळी या दोघांना पथारी व्यावसायिकांकडून गाड्या सोडून देण्यासाठी म्हणून ४,
हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.