वक्फ अधिकारी व सेवकाविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केला गुन्हा दाखल,

ebook.trendingstudysajagnagrikktimes.sajag-advertisement-offer
Advertisement

नांदेड मध्ये उडाली खळबळ.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : वक्फ मालमत्तेच्या देखरेख व कामकाजासाठी भ्रष्टाचारींची निवड केली गेली असेल तर त्या ठिकाणी भ्रष्टाचार होणारच?

आख्या भारतात वक्फ जमिनी मोठ्या प्रमाणावर असून त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे करण्यात आली आहे.

तर काही जागा विकल्या गेल्या आहेत. कारण त्या ठिकाणी भ्रष्टाचार बोकाळला आहे?

त्याचे उदाहरण म्हणजे काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

नांदेड येथील जिल्हा वक्फ अधिकारी व सेवकाला लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हकीकत अशी की तक्रारदार यांच्या धर्माबाद येथील इनामी जमीनीपैकी एक एकर जमीन फंक्शन हॉलसाठी भाडेतत्वार,

देण्यासाठी मुख्यकार्यकारी अधिकारी महराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड औरंगाबाद येथे अनुकुल अहवाल पाठविण्याकरीता संबंधित अधिकारी ५ लाख रुपयांची लाचेची मागणी केली.

तक्रारदार यांनी तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचत प्रतिबंधक विभाग नांदेड कार्यालयाकडे तक्रार दाखल केली.

कार्यालयाकडुन पंचासमक्ष केलेल्या लाच मागणी पडताळणी मध्ये लोकसेवक शेख लतिफोद्दीन मो. गौस मोहीदोद्दीन, वय ५० वर्ष, जिल्हा वक्फ अधिकारी नांदेड रा. नावघाट नांदेड यांनी,

तक्रारदार त्यांचेकडे उपरोक्त कारणासाठी ५ लाख रुपयांची लाचेची मागणी करुन त्यापैकी पहीला हप्ता म्हणुन १ लाख ५० हजार स्विकारण्याचा प्रयत्न केला.

तसेच त्यांचे कार्यालयीन सेवक मोहम्मद इम्रान मो. रब्बानी, वय ४० वर्ष, सेवक जिल्हा वक्फ अधिकारी कार्यालय, नांदेड यांनी,

तक्रारदार यांना लाच देण्यास प्रोत्याहन दिले व लोकसेवक शेख यांना लाच मागणीस सहकार्य केल्याचे निष्पन्न झाले.

म्हणुन दोघांविरुद्ध पोलीस ठाणे इतवारा नांदेड येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झाल्याची चर्चा वार्‍यासारखी पसरली. व दिवसभर उलट सुलट चर्चेला उधाण आले होते.

सदरची सापळा कार्यवाही पोलीस अधिक्षक कल्पना बारवकर, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, पोलीस उप अधिक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली,

पोलीस निरीक्षक कपिल शेळके, किशन चिंतोरे, सचिन गायकवाड, विलास राठोड, अंकुश गाडेकर, नरेंद्र बोडके, मारोती सोनटक्के, आशा गायकवाड यांनी पार पाडली आहे.

   *..............चौकट..........*

समाजाची संपत्ती गिळणाऱ्या वक्फ माफियांना जनतेने कायदेशीर मार्गाने चांगली अद्दल घडेल असा धडा शिकवण्यासाठी स्वतः पुढाकार घ्यावा.

वक्फ महामंडळा सारख्या सामाजीक महत्वाच्या विभागात लाचखोरी करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना व दलालांना तसेच समाजाची संपत्ती गिळणाऱ्या वक्फ माफियांना जनतेने कायदेशीर मार्गाने चांगली अद्दल घडेल असा धडा शिकवण्यासाठी स्वतः पुढाकार घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेल चे प्रदेश सचीव ऍड समीर शेख यांनी केले आहे.कुणालाही वक्फ अधिकाऱ्यांनी लाच मागितली तर कारवाई साठी थेट पोलिसांना संपर्क करावा, अथवा 9850038689 या क्रमांकावर ऍड समीर शेख यांना सल्ल्या साठी संपर्क साधावा असे आवाहन देखील ऍड समीर शेख यांनी केले आहे

Advertisement
Share Now