कोर्ट मॅनेज करुन देते म्हणून २ लाख ५० हजारांची लाच घेताना महिलेला एसीबीने पकडले,

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement

मावळ तालुक्यातील घटना. उडाली खळबळ.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : मावळ तालुक्यातील एका महिलेने थेट कोर्ट मॅनेज करून केसचा निकाल लावून देते म्हणत २ लाख ५०,

creat a new website 9999 ₹Digital visiting cardcreat a new website 4999 ₹

हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महिलेला,

अटक करून कोर्टात हजर केले असता कोर्टाने २० जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.शुभावरी गायकवाड असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.

तक्रारदार यांची वडगांव मावळ कोर्टात केस प्रलंबित आहे. कोर्ट मॅनेज करून त्या केसचा निकाल तक्रारदार यांच्या बाजूने लावून,

Advertisement

देते असे सांगून शुभावरी गायकवाड हिने अडीच लाखाच्या लाचेची मागणी केली होती. या संदर्भात तक्रादाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती.

तक्रारीची पडताळणी ८ व ९ जानेवारी करण्यात आली.त्यामध्ये गायकवाड लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पुण्याचे अधीक्षक राजेश बनसोडे मार्गदर्शनाखाली पथकाने महिलेला लाच स्विकारताना बुधवारी अटक केली.

Advertisement
Advertisement
Share Now